गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव नोंद
जगातील सर्वात उंच श्वान तुम्ही पाहिला आहात का? जर पाहिला नसेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ पहा. या श्वानाचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद आहे. या श्वानाची उंची इतर श्वानांच्या तुलनेत खूपच अधिक आहे.
जगातील सर्वात उंच श्वानाला पाहिल्यावर श्वानप्रेमी त्याची प्रजाती ओळखू शकतील. हा श्वान अधिकृतपणे जगातील सर्वात उंच श्वानाच्या स्वरुपात नोंदला गेला आहे. जीउसचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे.
ग्रेटडेन प्रजातीचा श्वान
जीउस एक ग्रेटडेन प्रजातीचा श्वान आहे. श्वानांची ही प्रजाती स्वतःच्या विशाल आकारासाठी ओळखली जाते. ब्रिटनी डेव्हिसने बालपणापासूनच ग्रेटडेन पाळण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या भावाने ब्रिटनीला जीउस भेटीदाखल दिला होता. ब्रिटनी आणि तिचे कुटुंब टेक्सासमध्ये राहते.
गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकौंटवर जीउसचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत जीउसला उडी घेताना पाहता येते. हा श्वान खरोखरच विशाल आणि आणि उंच आहे. जीउस इतर श्वानांपेक्षा खूपच वेगळा असला तरीही तो सर्वांसोबत मिळून-मिसळून राहत असल्याचे ब्रिटनी यांचे सांगणे आहे.
आहार अत्यंत अधिक
जगातील सर्वात उंच श्वानाचा आहारही खूपच अधिक आहे. जर या प्रजातीचा श्वान पाळायचा असल्यास तुम्हाला आर्थिक दृष्टय़ाही तयार रहावे लागणार आहे. ग्रेटडेन प्रजातीच्या या श्वानांचा आहार खूप अधिक असतो असे ब्रिटनीने सांगितले आहे.