कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची आज सर्वसाधारण सभा पार पडत आहे. नेहमी शिक्षकांच्या सभेत गोंधळ पाहायला मिळतो. त्यामुळे राज्यात कोल्हापूरची प्राथमिक शिक्षक बँक चर्चेत राहिली आहे. यंदाही हटके मुद्द्यावरून ही सभा गाजण्याची शक्यता आहे.
रविवारी दुपारी एक वाजता प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा शाहूपुरीतील आयर्विन ख्रिश्चन हॉल इथे पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडी कडून एक पत्र काढून विरोधकांचा आणि मागील सत्ताधारी मंडळाचा समाचार घेतला जाणार आहे.
दोन दिवसांपूर्वी मागील सत्ताधारी आणि आताच्या विरोधकांनी पत्रकार परिषद घेत सत्तेत असताना आम्ही काटकसर केली असा दावा केला होता. त्यावर आता आक्षेप घेत सत्ताधाऱ्यांनी थेट अहवाल काढत काटकसर की उधळपट्टी याचा थेट अहवालच सभेपूर्वी जाहीर केला आहे.
काय आहेत मुद्दे? काटकसर की उधळपट्टी एका दिवसात भज्याचे बिल 12 हजार 730
तिजोरी वाहतूक कोल्हापूर ते राधानगरी 24 हजार
तिजोरी ऑइलिंग आणि हँडल दुरुस्ती कोल्हापूर शाखा आणि मलकापूर शाखा 66 हजार
कोरोना काळात चार महिन्यातील बुके 52 हजार
सन 2019 ते 20 काळातील जेवणाचे बिल 3 लाख 58 हजार 852
संस्थापक पुतळा सजावट फक्त चुना लावणे 96 हजार 399
पार्किंग शुशोभीकरण 5 लाख
कोरोना काळातील सभा 2 लाख 91 हजार 947