Tarun Bharat

चिपळुणात खिडकी फोडून ऑफिसमधील लॅपटॉपची चोरी

चिपळूण/प्रतिनिधी

तालुक्यातील पेठमाप येथे बिल्डींगमधील स्लायडिंगची काच फोडून ऑफिसमधील लॅपटाप चोरीस गेल्याची घटना घडल आहे. याबाबतची फिर्याद यासीन अब्दुल रेहमान दळवी (53) यांनी पोलीस स्थानकात दिली. ही घटना 12 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.15 वा. च्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासीन दळवी यांनी आपल्या मालकीच्या पेठमाप येथील मनाहील हाईट या बिल्डींगमधील ऑफिसमध्ये लॅपटॉप ठेवला होता. कोणीतरी अज्ञात चोरटयाने बाथरुम शेजारी स्लायडींगची खिडकी फोडून ऑफिसमधील 15 हजार रुपये किंमतीची डेल कंपनीचा लॅपटॉप चोरुन नेला. दळवी यांनी दुसर्‍या ऑफिसला आल्यानंतर पाहिले असता लॅपटॉप दिसून आला नाही. त्यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातावर भादविकलम 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

मंडणगड नगरपंचायत कार्याक्रमावर योगेश कदम यांचा बहिष्कार

Omkar B

रत्नागिरी : साठ लाखाच्या लूटप्रकरणी आणखी एक गजाआड

Archana Banage

पंधरा दिवसानंतरही 60 टक्के दापोली अंधारात!

Patil_p

गुहागरातील सीव्हय़ू गॅलरी तीन आठवडय़ात पाडा

Patil_p

Ratnagiri : ‘कोकण रेल्वे’ मार्गावर सेमी हायस्पीड ‘वंदे भारत’ एक्स्पेस धावली सुसाट

Abhijeet Khandekar

जिह्यात दिवसाला 3 हजाराहून अधिक कोरोना चाचण्या

Patil_p
error: Content is protected !!