पर्वरी येथील दुचाकी वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडली : फोंडा वाहतूक पोलिसांनी दुचाकी चोरटयाला मोले येथे पकडले
प्रतिनिधी / फोंडा
फळसकाटा-मोले येथे चोरीची दुचाकी घेऊन बिनधास्त फिरणारा एक युवक वाहतूक पोलिसांच्या तावडीत सापडला. आकाश रवी नाईक (19, मूळ हुबळी रा. तिस्क उसगांव) असे त्याचे नाव आहे. संशयित फेंडा वाहतूक पोलिसांना काल गुरूवारी दुपारी 12 वा. सुमारास मोले येथे विनाहेल्मेट आढळल्याने कारवाई करताना सदर चोरीचा प्रकार उघड झाला. संशयिताने पर्वरी येथील एका इसमाची मेरशी येथून दुचाकी लांबविली होती.
प्राप्त माहितीनुसार फोंडा वाहतूक पोलीस फळसकाटा-मोले येथे वाहतूक नियमभंग करणाऱयावर चलन फाडण्य़ासाठी तैनात होते. यावेळी संशयित आकाश एक्टीवा जीए 03 एके 4251 दुचाकीने उसगावहून मोलेच्या दिशेने विनाहेल्मेट जात होता. डय़ुटीवरील वाहतूक पोलिसांनी विनाहेल्मेटमुळे त्याला अडविले. त्याचे नाव विचारले व त्याच्याजवळ वाहनाच्या चालविण्याचा परवाना व दुचाकीच्या कागदपत्राची मागणी वाहतूक पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गावकर यांनी केली. यावेळी ई-चलन मशिनवर वाहन क्रमांकानुसार सुकुर-पर्वरी येथील अमेय कुमार पाटील यांचे नाव झळकू लागले. त्यानुसार वाहन मालकाची विचारणा केल्यानंतर संशयित गोंधळला, पोलिसांना संशय बळावला. पोलिसांनी थेट मालकांशी मोबाईल फोनवर संपर्क साधला. त्यावेळी वाहन मेरशी येथून चोरीला गेल्याची माहिती दिली. सदरप्रकरणी तक्रार ओल्ड गोवा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आल्याची कबूली दिली.
त्यानुसार संशयित माने याला वाहन चोरीप्रकरणी वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित लांबविण्यात आलेली दुचाकी आपल्या मूळ गावी हुबळी येथे घेऊन जाण्य़ाच्या बेतात असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. फोंडा वाहतूक पोलिसाचे उपनिरीक्षक सत्यवान गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली, कल्पेश मुळगावकर, ,विदेश रायकर, रजत मडकईकर, प्रज्योत कुबळे यांच्या टीमने ही कारवाई केली. दुचाकीसह संशयित आकाश माने याला ओल्ड गोवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी ओल्ड गोवा पोलीस अधिक तपास करीत आहे.