Tarun Bharat

चोरटय़ाचा पळ काढण्याचा प्रयत्न फसला

कळंगूट पोलीस स्थानकातील प्रकार : काही वेळ वातावरण तंग, पोलिसांनाही शिवीगाळ, धक्काबुक्की

प्रतिनिधी /म्हापसा

सराईत गुन्हेगार आगुस्तीन कार्व्हालो (माजोर्डा सासष्टी) याला कळंगूट पोलिसांनी सोनसाखळी चोरीप्रकरणी अटक करून पोलीस स्थानकात आणले असता त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला पकडताना कळंगूट पोलिसांना बरीच दमछाक झाली यावेळी त्याचे शिवीगाळ व धमकी देत पोलिसांना हैराण केले. सुमारे 20 पोलिसांचा फौजफाटा त्याला पकडण्यासाठी तैनात केला. अखेर त्याला पुन्हा ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले.

 त्या आडदांड चोरटय़ाने सुटण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. पोलिसांनाही धक्काबुक्की केली. हा प्रकार सुरू असताना बघ्यांनी गर्दी केली. यावेळी चित्रीकरण करणाऱया पत्रकारांनाही धमकी दिली. या धक्काबुक्कीत काही पोलिसही किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे. यावेळी कळंगूट पोलीस स्थानकाच्या आवारात काहीवेळ वातावरण तंग बतले. पोलिसांनी त्या चोरटय़ाला पोलिसी हिसका दाखविल्यानंतर तो सरळ झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिवायवाडा-कळंगूट येथे वास्तव्यास असलेल्या अर्जून यल्लपा बेदाडोलकर याला आपल्या कारमध्ये कोंबून रस्त्यात त्याची सोनसाखळी तसेच रोकड लुटल्याप्रकरणी कळंगूट पोलिसांनी आगुस्तिनो कार्व्हालो(माजोर्डा-सासष्टी) या सराईत गुन्हेगारास हरमल येथून शिताफीने ताब्यात घेतले. ही घटना गुरुवारी सकाळी घडली.

ध्रम्यान, संशयित आरोपी एकूण वीस अन्य प्रकरणात पोलिसांच्या रडारवर असून त्यात एका अजामीनपात्र गुह्यांचाही समावेश आहे. गुरुवारी दिवसाढवळय़ा घडलेल्या या घटनेचा अवघ्या चोवीस तासांच्या आत छडा लावण्यात यश मिळविले. परिसरातील सिसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक दत्तगुरु सावंत यांच्यासमवेत हवालदार विद्यानंद आमोणकर, शिपाई आमीर गरड, विजय नाईक, गणपत तिळोजी यांनी या  मोहिमेत भाग घेतला.

Related Stories

आमदार गणेश गावकर यांची प्रकृती स्थीर, श्रीलंकेत उपचार

Amit Kulkarni

मडगाव घाऊक मासळी मार्केट सकाळी 9 बंद

Patil_p

…दुधाचे पैसे खात्यात कधी जमा होईल?

Patil_p

सप्तसूर संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

Amit Kulkarni

शाळांच्या विलिनीकरणाचा निर्णय तत्काळ मागे घ्या

Amit Kulkarni

मडगावातील विक्रेत्यांचा पालिकेवर मोर्चा

Amit Kulkarni