तरुणभारत ऑनलाइन
सध्या कोल्हापुरात पावसाची उघडीप सुरु आहे.मात्र धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने गुरुवारी राधानगरी धरणाचे ३ ,४,५. आणि ७ क्रमांकाचे पाच दरवाजे उघडले होते.दरम्यान पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे धरणाचा ३ क्रमांकाचा दरवाजा पुन्हा बंद झाला आहे. सध्या राधानगरी धरणाच्या स्वयंचलित चार दरवाजातून ५७१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर विद्युत गृहातून १६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे . राधानगरी धरणातून एकूण ७३१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे.