वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित
दोन सुपरहिट सीझननंतर क्रिमिनल जस्टिसचा तिसरा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये पंकज त्रिपाठी हे माधव मिश्राची भूमिका साकारताना दिसून येतील. तर यावेळी त्यांच्या विरोधातील वकील म्हणून श्वेता बासू प्रसाद झळकणार आहे.
या सीरिजमध्ये याचबरोबर स्वस्तिका मुखर्जी पूरब कोहली, आदित्य गुप्ता, देशना दुगड आणि गौरव गेरा देखील दिसून येतील. ‘क्रिमिनल जस्टिस 3’ ही सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर 26 ऑगस्ट रोजी स्ट्रीम करण्यात येणार आहे. रोहन सिप्पी यांनी या तिसऱया सीझनचे दिग्दर्शन केले आहे. या सीझनसोबत आम्ही व्हिज्युअल इफेक्ट्ससोबत याला आणखी मोठे स्वरुप दिले असल्याचे सिप्पी यांनी म्हटले आहे.
माधव मिश्रा ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी यापूर्वी उचलून धरली आहे. अवघड संकल्पना सोप्या करण्याची या व्यक्तिरेखेची क्षमता प्रेक्षकांना भावली ओ. ‘क्रिमिनल जस्टिस : अधुरा सच’मध्ये माधव मिश्रा या व्यक्तिरेखेला अत्यंत वेगळय़ा स्थितीत सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येईल असे पंकज त्रिपाठी यांनी सांगितले आहे.