प्रतिनिधी /बेळगाव
राज्य वायव्य पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेससह अपक्षांनी बुधवारी अर्ज दाखल केले. पदवीधर मतदारसंघासाठी एकूण पाच जणांनी अर्ज दाखल केले तर शिक्षक मतदारसंघासाठी तिघांनी चार अर्ज दाखल केले आहेत.
काँग्रेसतर्फे शिक्षक मतदारसंघासाठी प्रकाश हुक्केरी यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. तर अपक्ष म्हणून शिवनगौडा गौडर व चंद्रशेखर गुडाशी यांनी अर्ज दाखल केला. पदवीधर मतदारसंघासाठी एकूण 5 अर्ज दाखल झाले आहेत.
पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसतर्फे सुनील संख यांनी अर्ज दाखल केला. अपक्ष म्हणून बसवराज कबीर, उदयकुमार शिंपी, राघवेंद्र कुकटणकर आणि भीमसेन बागी यांनी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसने शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. काँग्रेसने मराठा मंदिर येथे बैठक घेऊन त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केले आहेत.