बेळगाव – पुण्याहून उड्डपीकडे जाणाऱ्या बसचे मागील चाक फुटून एका खाजगी बसला रस्त्याच्या मधोमध आग लागली. या थरारक घटनेत चालकाच्या दक्षतेमुळे सुदैवाने प्रवासी सुखरूप बचावले आहेत. बस मध्ये ३० पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते.
रेशमा ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बसवून काल पुण्याहून उड्डपीला जात होती. कारवार- हुबळी – धारवाड बायपास जवळ आज पहाटे 2:45 सुमारास अचानक ट्रॅव्हल्सचे मागचे चाक फुटले हे लक्षात येताच, प्रवाशांना चालकाने खाली उतरवले. प्रवाशांना खाली उतरवताच ट्रॅव्हल्स आग लागली. काही क्षणात आगीने ट्रॅव्हल्सला पूर्णपणे वेडा घातला त्यामुळे खाजगी ट्रॅव्हल्स पूर्णपणे जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन आग विझवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
Previous Articleकुत्र्यांच्या हल्ल्यात मेंढ्या ठार कोकरे बेपत्ता
Next Article बडेकोळमठ क्रॉस जवळ भीषण अपघात