Tarun Bharat

दोन वर्षानंतर ‘दहीहंडी’चा थरार..!


निर्बंधमुक्तीमुळे गोविंदा पथकांमध्ये उत्साह -शहरातील आयोजकांकडून जय्यत तयारी
‘गोविंदा रे गोपाळा’चा आवाज घुमणार

Advertisements

कोल्हापूर / इम्रान गवंडी

दोन वर्षे कोरोना निर्बंधामुळे राज्यात दहीहंडीसह अन्य सण, उत्सव साधेपणाने साजरी झाले. यंदा राज्य सरकारने कोरोना निर्बंध हटवल्यामुळे सर्वत्र दहीहंडीचा थरार पहावयास मिळणार आहे. अवघ्या 25 दिवसांवर आलेल्या दहीहंडीसाठी आयोजकांची जय्यत तयारी सुरू आहे तर गोविंदा पथकांनीही थर रचण्याचा सराव सुरू केला आहे.

कोल्हापुरात ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जल्लोषात दहीहंडी होते. गोविंदा पथकांना लाखोची बक्षिसेही दिली जातात. यावेळी काही मंडळांकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. त्यामुळे कलाकारांना व्यासपीठ मिळते. साऊंड सिस्टीमवर थिरकणारी तरूणाई, आकर्षक विद्युतरोषणाई, सेलिब्रिटींचा नृत्याविष्कार, फुलांचा वर्षाव, रंगांच्या उधळणीत गोविंदा पथकांचे दहीहंडी फोडण्यासाठी मनोरे उभारले जातात, दहीहंडी फोडल्यानंतरचा जल्लोषामुळे आबालवृद्धाना याची उत्सुकता लागली आहे. यंदा निर्बंधमुक्तीत दहीहंडीचा थरार दिसणार आहे.

शहरात सर्वात मोठय़ा दहीहंडीचे आयोजन धनंजय महाडिक युवाशक्ती करते. छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाद्वार रोड न्यू गुजरी मित्र मंडळ, गंगावेशमधील भाऊ नाईक गल्ली सांस्कृतिक मंडळ, लक्ष्मीपुरीतील कोल्हापूर धान्य व्यापारी मंडळ, राजारामपुरी नवव्या गल्लीतील वीन ग्रुप, मनसे जिल्हा शाखा, आझाद गल्लीतील गुजरी कॉर्नर, गोकूळ दुध संघ आदींकडून दहीहंडी उभारली जाते.

यंदाची दहीहंडी धुमधडाक्यात, गोविंदा पथकांनी तयारीला लागावे

कोरोनामुळे दोन वर्षे प्रशासनाला सहकार्य करत विविध सामाजिक उपक्रम राबवले. यंदा निर्बंध हटवल्याने युवाशक्तीच्यावतीने यंदाची दहीहंडी धुमधडाक्यात केली जाणार आहे. त्याचे नियोजन सुरू असून गोविंदा पथकांनी तयारीला लागावे.
कृष्णराज महाडिक, युवाशक्ती दहीहंडी आयोजक

मुंबईतील डान्स शो प्रमुख आकर्षण

न्यू गुजरी मित्र मंडळाने यंदा दहीहंडीचे आयोजन केले आहे. दहीहंडी फोडणाऱया पथकाला एक लाखाचे बक्षीस दिले जाणार आहे. आकर्षक रोषणाई, आतषबाजी, स्पेशल लाईट इफेक्ट, लेझर शो बरोबर सेलिब्रिटींसह मुंबईतील प्रसिद्ध डान्स ग्रुप प्रमुख आकर्षण असणार आहे.
किरण नकाते, संस्थापक अध्यक्ष, न्यू गुजरी मित्र मंडळ, महाद्वार रोड

शासनाच्या निर्णयाचे स्वागत, सराव सुरू

यंदा कोरोनाचे सर्व निर्बंध उठल्यामुळे उत्साह आहे. जोरदार सराव सुरू केला आहे. यापुर्वी धनंजय महाडिक युवाशक्तीची सलग तीन वर्षे दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला आहे. यंदाही त्यासाठी पथकातील कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.
रामगौंडा पाटील, संघर्ष ग्रुप गोविंदा पथक, गडहिंग्लज

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात बारा नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर

Archana Banage

ओबीसी राजकीय आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Archana Banage

आजारास कंटाळून पती, पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

Archana Banage

गगनगडावरील दर्ग्याशेजारील अवैध बांधकामे रोखावीत

Archana Banage

संचारबंदी काही अंशी शिथिल झाल्याने पोलिसांनी बॅरीकेटस् हटविले

Archana Banage

राज्यातील पतसंस्थांच्या जाचक अटी शिथिल होणार

Archana Banage
error: Content is protected !!