Tarun Bharat

उद्या रंगणार ‘गोविंदा रे गोपाळा’चा थरार!

Advertisements

जिल्हय़ात 251 सार्वजनिक, 2,339 खासगी दहीहंडय़ा

प्रतिनिधी/ रत्नागिरी

गेल्या 2 वर्षांच्या विरामानंतर यावर्षी निर्बंधमुक्त दहीहंडीची सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. गोविंदापथकेही उत्सवासाठी सज्ज झाली आहेत. उद्या शुक्रवारी जिल्हाभरात गोपाळकाल्याचा जल्लोष रंगणार आहे. जिल्ह्य़ात यावर्षी 251 सार्वजनिक तर 2 हजार 339 खासगी दहीहंडय़ा उभारण्यात येणार असून 8 ठिकाणी दहीहंडीनिमित्त मिरवणुक<ा काढण्यात येणार आहेत.

   दहीहंडी उत्सव हिंदू धर्मातील एक पवित्र व प्रसिध्द सण आहेच शिवाय दहीहंडी या क्रीडा प्रकारातून युवकांच्या कौशल्याची परीक्षा होते. या स्पर्धेतून युवकांना, एक वेगळा आनंद मिळत असतो. हा उत्सव शुक्रवार 19 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. सात ते आठ थराच्या हंडय़ा फोडण्यासाठी जिल्हय़ासह जिह्याबाहेरची पथकेही कसून सराव करत आहेत. सध्या दहीहंडय़ांच्या थरांबरोबरच बक्षिसांच्या किंमतीतही स्पर्धा निर्माण झाली आहे. दहीहंडीला राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे. विविध राजकीय पक्षांकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून भलीमोठी बक्षिसे  व त्या नियोजनावर पैशांचा चुराडा केला जात आहे. 

  महाराष्ट्र सरकारने 2012 मध्ये गोविंदाचा साहसी क्रीडा प्रकारात समावेश केला आहे. गोविंदांच्या सुरक्षेसाठी रुग्णवाहिका, डॉक्टर यांसह इतर सर्व उपाययोजनांची व्यवस्था गोविंदा पथकांनाच करावी लागणार आहे. सर्वाधिक दहीहंडय़ा जयगड, दापोली, मंडणगड, बाणकोट, दाभोळ येथे फोडण्यात येणार आहेत.

            दापोलीत दहीहंडीच्या बक्षिसांचे थरावर थर

मौजे दापोलीः गेल्या काही वर्षांच्या खंडानंतर यावर्षी दापोलीत दहीहंडी उत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. यामुळे आयोजकांकडून बक्षिसांचे थरावर थर रचले जात असल्याचे पहायला मिळत आहे. तसेच लावणी नृत्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दापोली येथे शिवसेना व युवासेना यांची 3 लाख 51 हजार रूपयांची दहीहंडी उभारण्यात येणार असून यावेळी लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आमदार योगेश कदम पुरस्कृत 3 लाख 33 हजार 333 रूपयांची दहीहंडी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ासमोर उभारण्यात येणार आहे. यानिमित्त ‘नाद करायचा नाय’ हा नृत्य कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रवादीच्यावतीने 1 लाख 11 हजार 101 रूपयांच्या बक्षिसाची दहीहंडी उभारण्यात येणार असून त्यानिमित्त ‘पाऊल खुणा महाराष्ट्राच्या’ हा कार्यक्रम पार पडणार आहे. तालुक्यात खासगी 327 तर ग्रामीण भागासह सार्वजनिक 37 दहीहंडय़ा फोडल्या जातात.                 

          चिपळुणात 22 सार्वजनिक मंडळे उभारणार दहीहंडी

चिपळूणः जल्लोषाला उधाण आणणारा दहीहंडी उत्सव 2 वर्षांनी पुन्हा एकदा शुक्रवारी त्याच उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांसह सार्वजनिक मंडळांनी तयारी सुरु केली आहे. यावेळी तालुक्यात तब्बल 22 सार्वजनिक मंडळे दहीहंडी उभारणार आहेत. पिंपळीनाका येथे माजी जि. प. सदस्य विनोद झगडे मित्र मंडळाच्यावतीने तब्बल 1 लाख रूपये बक्षीसाची दहीहंडी उभारली जाणार आहे. काही दिवसांपासून गोविंदापथकांनी सराव सुरु केला होता. शुक्रवारी होत असलेल्या दहीहंडीचे सार्वजनिकसह खासगी ठिकाणी आयोजन केले आहे. यात चिपळुणात 13 सार्वजनिक तर खासगी 300, सावर्डेत सार्वजनिक 4 तर खासगी 150 व अलोरे सार्वजनिक 5 तर खासगी 3 दहीहंडय़ा उभारण्यात येणार आहेत.

             खेड शिवसेना-युवासेना उभारणार दीड लाखाची दहीहंडी

खेडः आमदार योगेश कदम यांच्या सौजन्याने येथील शिवसेना व युवासेनेच्यावतीने  तीनबत्तीनाका येथे 1 लाख 51 हजार रूपयांच्या पारितोषिकाची दहीहंडी उभारण्यात येणार आहे. या दहीहंडीस सलामी देणाऱया गोविंदा पथकास रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. महिला गोविंदा पथकानाही रोख पोरितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. याचवेळी चित्रपट अभिनेत्री सुरभी मोरे यांच्या नृत्यासह समूह नृत्यही सादर हेणार आहे. या दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन निकेतन पाटणे, सचिन धाडवे यांनी केले आहे.

Related Stories

भांबेडमधील सर्पदंश मृत्यू प्रकरणाची होणार चौकशी

Omkar B

दापोलीत सापडला आणखी एक मृत डॉल्फीन

Patil_p

तोंडवळी प्राथमिक शाळा झाली विद्यार्थ्यांना विना सुनी

Ganeshprasad Gogate

घरेलू कामगारांच्या खात्यावर आर्थिक मदत जमा

Ganeshprasad Gogate

रत्नागिरी : संगमेश्वर जवळ कार अपघात, महिला जखमी

Abhijeet Shinde

दोडामार्गमधून 138 परप्रांतीय कामगार रवाना

NIKHIL_N
error: Content is protected !!