सारा अली खान मुख्य भूमिकेत
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने आता चाहत्यांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. सारा लवकरच ‘गॅसलाइट’ या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर निर्मात्यांनी प्रदर्शित केल आहे. ‘गॅसलाइट’च्या या ट्रेलरमध्ये सारासोबत प्रसिद्ध अभिनेता विक्रांत मेसी आणि चित्रांगदा सिंह दिसून येत आहे.


‘गॅसलाइट’ या चित्रपटाचा ट्रेलर डिस्ने प्लस हॉटस्टारच्या युटय़ूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटात सारा अली खान एका दिव्यांग युवतीची भूमिका साकारत आहे. तर चित्रांगदा सिंह या युवतीच्या सावत्र आईच्या भूमिकेत आहे. विक्रांत मेसी हा या युवतीच्या वडिलांचा बॉडीगार्ड म्हणून भूमिका साकारतोय. ‘गॅसलाइट’ हा चित्रपट मर्डर मिस्ट्री धाटणीचा आहे.
स्वतःच्या वडिलांना शोधणाऱया युवतीची भूमिका सारा साकारत आहे. गॅसलाइटचा ट्रेलर अत्यंत रोमांचक आहे. या चित्रपटातील साराची भूमिका आव्हानात्मक असल्याचे मानले जात आहे. गॅसलाइट हा चित्रपट 31 मार्च रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. सारा अली खान अन् विक्रांत मेसी ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.