कुणाल खेमूचा नवा चित्रपट
कुणाल खेमूचा आगामी चित्रपट कंजूस मक्खीचूसचा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. कॉमेडी धाटणीच्या या चित्रपटात कुणाल खेमू अत्यंत कंजूस व्यक्तीच्या भूमिकेत दिसून येणार आहे. कुणाल यात जमुना प्रसाद पांडे ही व्यक्तिरेखा साकात आहे. जमुना प्रसाद हा देवरिया शहरात स्वतःच्या कंजुसपणामुळे बदनाम असल्याचे यात दर्शविण्यात आले आहे. स्वतःच्या आईवडिलांना चारधामच्या यात्रेवर पाठविण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा त्याचा उद्देश असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते.
या चित्रपटात जमुना प्रसाद आणि सिस्टीममधील संघर्ष दर्शविण्यात आला आहे. शासकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर यात विनोदाचा खुबीने वापर करत प्रकाश टाकण्यात आला आहे. कंचूस मक्खीचूस या चित्रपटात कुणाल खेमूसोबत श्वेता त्रिपाठी, पीयूष मिश्रा, अलका अमीन आणि राजीव गुप्ता हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत आहेत. याचबरोबर दिवंगत कॉमेडियन आणि अभिनेते राजू श्रीवास्तव देखील यात दिसून येणार आहेत. ट्रेलमध्ये त्यांची झलक दिसून येत आहे. कंचूस मक्खीचूस हा चित्रपट 24 मार्च रोजी झी5 वर प्रदर्शित होणार आहे.