रणवीर सिंह दिसणार डबल रोलमध्ये
रोहित शेट्टीने स्वतःचा नवा चित्रपट ‘सर्कस’चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. कॉमेडीने भरलेल्या सर्कसचा ट्रेलर अत्यंत मनोरंजक आहे. रणवीर सिंह स्वतःच्या या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना हसविणार आहे.
सर्कसच्या ट्रेलरमध्ये अनेक कलाकार दिसून येत आहेत. या चित्रपटात रणवीर सिंहसोबत जॅकलीन फर्नांडिस आणि पूजा हेगडेही मुख्य भूमिकेत आहे. रणवीर सिंह या चित्रपटाद्वारे नव्या अवतारात प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसून येणार आहे. सर्कमध्ये इलेक्ट्रिक मॅनची भूमिका रणवीरने साकारली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तो दुहेरी भूमिकेत आहे.
जॅकलीन आणि पूजा हेगडेसोबत रणवीरची जोडी चाहत्यांना खिळवून टाकणारी ठरणार आहे. ट्रेलरमध्ये रणवीरचाच प्रभाव दिसून येत आहे. तसेच दीपिका पदूकोनही या चित्रपटात एका गाण्यात दिसून येणार असल्याचे समजते. अजय देवगणने यात कॅमियो भूमिका साकारली आहे.
रणवीर सिंह स्वतःचा चित्रपट ‘सर्कस’द्वारे चाहत्यांना नाताळाची विशेष भेट देण्यास येणार आहे. रोहित शेट्टीचा हा चित्रपट नाताळावेळी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट 23 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.