Tarun Bharat

वॉशिंग्टनच्या जागी शाहबाज अहमदला संधी

Advertisements

वृत्तसंस्था/ हरारे

या आठवडय़ात झिंबाब्वेत तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरचा समावेश होता. दरम्यान वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाल्याने तो या मालिकेसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही. त्याच्या जागी आता बंगालचा 27 वर्षीय अष्टपैलू शाहबाज अहमदचा समावेश करण्यात आला आहे.

शाहबाज अहमदला या मालिकेत आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. 2022 च्या आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाकडून खेळताना डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाज अहमदने 16 सामन्यात 4 बळी मिळविले तर फलंदाजीत 219 धावा केल्या आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शाहबाज अहमदची झिंबाब्वेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने निवडीची घोषणा केली आहे. उभय संघातील या मालिकेतील पहिला सामना उद्या गुरुवारी खेळविला जाणार आहे.

Related Stories

पीएसजी क्लबकडे प्रेंच फुटबॉल चषक

Patil_p

2021 मध्येही ऑलिम्पिक अशक्य?

Patil_p

बांगलादेश संघात तमीम इक्बालचे पुनरागमन

Patil_p

बेंगळूर बुल्स, हरियाणा स्टीलर्स संघांचे विजय

Patil_p

डेल स्टीन कँडी टस्कर्समध्ये दाखल

Omkar B

रिषभ पंतला पहिला डोस

Amit Kulkarni
error: Content is protected !!