Tarun Bharat

डोळय़ातच रंगविला तिरंगा

Advertisements

तामिळनाडूतील 52 वर्षीय कलाकाराची कमाल

देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. यानिमित्त भारत सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू केली असून यांतर्गत पंतप्रधानांनी देशातील प्रत्येक नागरिकाला 13-15 ऑगस्टदरम्यान घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले आहे. अशा स्थितीत आता सर्व परिसर ‘तिरंगामय’ दिसून येत आहे. आता ‘हर घर तिरंगा’वरून एका कलाकाराने पेलेली कमाल पाहून तुम्ही दंग व्हाल.

कोइम्बतूरमधील 52 वर्षीय युएमटी राजा एक मिनिएचर आर्टिस्ट असून त्यांनी स्वातंत्र्यदिनापूर्वी स्वतःच्या डोळय़ात तिरंगा काढून घेत त्याची छायाचित्रे शेअर केली आहेत. राजा यांनी एका पातळ अन् लहान तुकडय़ावर तिरंगा काढत तो डोळय़ातील खालील हिस्स्यावर सुमारे 20 मिनिटांपर्यंत चिकटवून ठेवला होता. आम्हाला आमच्या मातृभूमीला डोळय़ांप्रमाणे सुरक्षित करायला हवे असे त्यांनी म्हटले आहे.

अत्यंत सावधपणे केले काम

राजाने स्वतःच्या मुलीच्या (नेत्रतज्ञ) देखरेखीत तिरंगा रंगवून तो स्वतःच्या डोळय़ात चिकटविला होता. कुठल्याही तज्ञाच्या देखरेखीशिवाय असे धाडस करू नका असे आवाहन राजा यांनी केले आहे. डोळय़ात तिरंगा ठेवण्यापूर्वी त्यांनी यासंबंधी विस्तृत अध्ययन केले होते. तसेच डोळय़ावर याचा कशाप्रकारे प्रभाव पडेल हे जाणून घेतले होते. डोळय़ात रंग फैलावल्यास किंवा कॉर्नियानजीक गेल्यास ते अत्यंत घातक ठरू शकते असे त्यांनी सांगितले आहे.

Related Stories

च्युइंग गम चघळून होते कमाई

Patil_p

45 लाख रुपयांशी उशी

Patil_p

जगातील सर्वात मोठे मांजर

Patil_p

९ जानेवारी रोजी ‘गांधी शांती यात्रा’ पुण्यात

prashant_c

‘ग्लोबल वॉर्मिंग’चे महाआव्हान

Patil_p

नातीसोबत 88 वर्षीय वृद्ध झाला ग्रॅज्युएट

Patil_p
error: Content is protected !!