Tarun Bharat

दहशतवाद्याच्या घरावर फडकला तिरंगा

Advertisements

वृत्तसंस्था/श्रीनगर

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव पाहता सरकारने ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर जम्मूमध्ये केवळ 6 दिवसांमध्ये एक लाखांहून अधिक ध्वजांची विक्री झाली आहे. जम्मूतील डोडामध्ये लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर हारुन उर्फ खुबैबच्या घरावर तिरंगा फडकत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. स्वतःच्या देशाचा ध्वज फडकवून गर्वाची अनुभूती करत आहे. मी माझ्या मुलाला जेथे कुठे असशील तेथे स्वतःच्या देशाचा ध्वज फडकव, असे सांगू इच्छितो असे खुबैबच्या वडिलांनी म्हटले आहे.

खुबैबने दहशतवादाचा मार्ग सोडून देत मुख्य प्रवाहात परतावे असे आम्ही त्याला सातत्याने सांगत आहोत. प्रत्येकाने स्वतःच्या घरात तिरंगा फडकवावा, असे हुबैबच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!