International Film Festival of India (IFFI) : गोवा आंतरराष्ट्रिय फिल्म फेस्टिव्हलमध्ये इस्त्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड ( Nadav Lapid ) यांनी वादग्रस्त चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’ ( The Kasmir Files ) या चित्रपटावर “अभद्र आणि अपप्रचारी” अशा केलेल्या टिप्पणीमुळे राजकीय वादळ उठले आहे. सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी ‘ईप्फी’चे ज्युरी लॅपिडवर जोरदार टीका केली, तर शिवसेना सह अऩेक विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्य बोलण्याचे धाडस केल्याबद्दल लॅपिड यांचे कौतुक केले.
या चित्रपटाचे प्रमुख अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी एक ट्विट करताना ज्युरींच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवर एक व्हिडीयो टाकून काश्मिर फाईल्सचे सत्य काही लोकांच्या गळ्यात काट्य़ासारखा रुतला आहे. ते गिळू शकत नाही किंवा ओकू ही शकत नाही. काश्मिर फाईल्स ही फिल्म नसून आंदोलन असल्याचे अनुपम खेर यांनी म्हटले आहे.”
53 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मधील ज्युरी पॅनेलवर अध्यक्ष असलेल्या लॅपिडने या फिल्म फेस्टिव्हलच्या स्पर्धात्मक विभागात चित्रपटाच्या समावेशामुळे नाराजी व्यक्त केली होती. आयोजकांची ही कृती ज्युरीसाठी धक्का असल्याचे म्हणुन हा चित्रपट अभद्र आणि अप्रचारी असल्याचे म्हटले होते. यावर लॅपिडच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी सहमती दर्शवली होती.