इजिप्तमधील पिरॅमिड्स जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहेत. आजवर या पिरॅमिड्ससंबंधी बरेच संशोधन झालेले आहे. पिरॅमिडची अनेक रहस्ये आता मानवाला समजलेली असली तरी अजूनही अनेक नव्या बाबी उघड होत असतात. नुकताच येथील एका पिरॅमिडमध्ये एक गुप्त बोगदा सापडला असून या बोगद्यात इतिहासातील अनेक रहस्ये दडलेली आहेत, असे वैज्ञानिकांना वाटत आहे.
जगप्रसिद्ध गिझ्झाच्या पिरॅमिडमध्ये हा अरुंद बोगदा आढळून आला आहे. तो या पिरॅमिडच्या प्रवेशद्वारानजीकच असल्याचे आता इतक्मया वर्षांनी कळून आले आहे. त्याची लांबी 30 फूट असून त्याचा शोध पिरॅमिडच्या दर्शनीभागाचे स्कॅनिंग करताना लागला आहे. आजवर ही बाब कशी उघड झाली नाही, याचे वैज्ञानिकांना आश्चर्य वाटत आहे. तथापि, आता त्यांनी या बोगद्याचे सखोल संशोधन करण्यास प्रारंभ केला असून बोगद्याच्या रचनेला कोणताही धक्का न पोहोचवता हे संशोधन करण्यासाठी त्यांनी स्वतंत्ररीत्या योजना तयार केली आहे.
गिझ्झाचा पिरॅमिड 4 हजार 500 वर्षे जुना आहे. त्यामुळे हा बोगदाही तितकाच जुना असण्याची शक्मयता आहे. त्यात नेमके काय आहे? हे अद्याप समजलेले नाही. तसेच घाईगडबड करून त्यात प्रवेश करण्याचा प्रयत्नही वैज्ञानिकांनी केलेला नाही. प्रथम या बोगद्याबद्दल आवश्यक ती माहिती बाहेरून मिळाल्यानंतरच आत प्रवेश करण्याबद्दल विचार केला जाणार आहे. कदाचित यंत्रमानवाला आत सोडून बोगद्यात नेमके काय आहे, हे प्रथम पाहिले जाण्याची शक्मयता आहे. कदाचित या बोगद्यात काही इतिहासकालीन वस्तू ठेवलेली असण्याची शक्मयता आहे. सध्या त्याबद्दल केवळ अनुमान करण्याचेच काम सुरू आहे. येत्या पाच-सहा महिन्यात या बोगद्याचा रहस्यभेद होऊ शकेल. कदाचित या बोगद्यामुळे आजवरच्या इजिप्तच्या ज्ञात इतिहासाला वेगळी कलाटणी मिळू शकेल, अशीही शक्मयता संशोधक व्यक्त करताना दिसतात. काही पुरातत्व संशोधकांनी या बोगद्याबद्दल अत्यंत खबरदारी बाळगावी आणि घाई करून कोणतेही संशोधन करण्याचा अट्टहास करू नये, असा सल्ला दिला आहे. तथापि, जगभरात या बोगद्यामुळे एक नवा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे, हे निश्चित आहे.