Tarun Bharat

गाडीही आली, कचरा संकलन केंव्हा?

Advertisements

कचरा डेपो उद्घाटनास उलटले 4 महिने

वार्ताहर /गुंजी

गुजी ग्राम पंचायतीच्यावतीने गतवषीपासून कचरा डेपो उभारण्याचे काम सुरू होते. सुरुवातीच्या काळात कचरा डेपोला येथील काही ग्रामपंचायत सदस्यांसह नागरिकांनी कडाडून विरोध केला तर काही ग्राम पंचायत सदस्यांनी आपल्याला कचरा डेपोबद्दल अनभिज्ञ ठेवल्याचा कांगावा केला होता. अखेर कचरा डेपोची उभारणी होऊन एप्रिल महिन्यामध्ये त्याचे उद्घाटनही करण्यात आले.

  त्यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी व पिडिओनी लवकरच ग्राम पंचायतीला कचरा गाडी येणार असून ती येण्यापूर्वी ट्रक्टर लावून कचरा संकलन करणार असल्याचे सांगितले होते. तत्पूर्वी म्हणजेच सहा महिने आधी कचरा संकलनासाठी घरोघरी बकेटांचे वितरण करण्यात आले होते. कचरा डेपोचे उद्घाटन होऊन चार महिने लोटले. तसेच कचरा गाडीही पंचायत कार्यालयासमोर उभी करण्यात आली आहे. मात्र अद्याप कचरा संकलनास प्रारंभ न केल्याने नागरिकांतून कचरा संकलन केव्हा होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ग्राम पंचायत व्याप्तीतील सर्व गावातील कचरा संकलन करण्यासाठी सुसज्ज डेपोची उभारणी केली असून यामध्ये सुका व ओला कचरा वेगळा करून खतनिर्मिती केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याकरीता गावातील एका स्वसहाय्य संघातील महिलांची नेमणूक करण्यात आली आहे. कचरा संकलनाला लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Related Stories

पोवडय़ातून जागविला संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास

Patil_p

विमानातून 57 मेट्रिक टन साहित्याची वाहतूक

Omkar B

वटपौर्णिमेचे व्रत मोठय़ा भक्तिभावाने

Amit Kulkarni

सांबरा येथे पार पडला प्रशिक्षणार्थी एअरमनचा दीक्षांत सोहळा

Patil_p

येळ्ळूर प्रवेशद्वाराजवळील ‘तो’ कचरा हटवा ग्रामपंचायतने लक्ष देण्याची विद्यार्थ्यांची मागणी

Omkar B

यंदा गणेशमूर्तींवर हॅण्डवर्कची क्रेझ

Amit Kulkarni
error: Content is protected !!