ढगफुटीचे प्रत्यंतर : जनजीवन विस्कळीत
प्रतिनिधी /बेळगाव
महाराष्ट्र, कर्नाटकसह अनेक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सोगल (ता. बैलहोंगल) सोमनाथ मंदिर परिसरात शुक्रवारी दमदार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. सोगल परिसरातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे.
सोगल येथील शिव-पार्वतीचे दर्शन घेण्यापूर्वी मंदिरासमोरील धबधब्याखाली स्नान करतात. शुक्रवारी या धबधब्यातून प्रचंड वेगाने पाणी कोसळत होते. अशी स्थिती यापूर्वी आम्ही कधीच पाहिली नाही, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. धबधब्यातून फेसाळत कोसळणारे पाणी मंदिरांच्या पायऱयांवर जात होते.
शुक्रवारी कोसळलेल्या दमदार पावसामुळे सोगल परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यासंबंधी मंदिराचे पुजारी निंगय्या यांच्याशी संपर्क साधला असता असा पाऊस आम्ही कधीच पाहिला नाही. धबधबाही यापूर्वी असा प्रवाहित झालेला आम्ही पाहिला नक्हता, असे त्यांनी सांगितले.