प्रवीण आर्लेकर यांची माहिती, ठराव मांडणाऱया स्वाती गवंडी यांचे अभिनंदन
प्रतिनिधी /पेडणे
कोरगाव पंचायतीच्या माजी सरपंच तथा विद्यमान पंचायत सदस्य स्वाती गवंडी यांनी विधवा प्रथेविरुद्ध मांडलेला ठराव हा महिलांबाबत क्रांतिकारक आणि अभिनंदनीय आहे. आपण त्याचे खास कौतुक आणि अभिनंदन करत आहे. गोव्याच्या विविध भागातील तसेच पेडणे तालुक्मयातील पंचायतींनी अशा प्रकारचे ठराव घेऊन महिलांबाबत जागृती करून वाईट असलेल्या प्रथा मोडीत काढण्यासाठी सहकार्य करावे. आपण येत्या विधानसभा अधिवेशनात विधवा प्रथेविरोधात ठराव मांडणार असून मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार प्रवीण आर्लेकर यांनी कोरेगाव येथे केले.
कोल्हापूर जिह्यातील हेरवाड गावात विधवा प्रथेविरोधात सर्वात प्रथम ठराव मांडून अनिष्ट प्रथा मोडीत काढण्यासाठी एक क्रांतिकारक पाऊल उचलले होते, त्याचेच अनुकरण गोव्यातील पत्रकार आणि इतर सामाजिक संस्थानी तिथे जाऊन केले. त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केल्यानंतर त्याची दखल घेत कोरगाव तसेच धारगळ पंचायतीने याबाबत महत्त्वाचा ठराव विधवा प्रथेविरुद्ध घेऊन एक अभिनंदनीय असे कार्य केल्याचे प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कोरगावच्या माजी सरपंच स्वाती गवंडी त्याचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन आणि कौतुक केले .
कोरगावचे पंच सदस्य समिल भाटलेकर, ठरावाला अनुमोदन देणाऱया विनिता मांदेकर, निकिता तोरस्कर, ज्योती शेटगावकर, आरती देसाई, राजेश्री गावाडे, ललिता गवंडी, नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर, नरेश कोरगावकर आदी यावेळी उपस्थित होते.
संपूर्ण गोव्यात जागृती व्हायला हवी : स्वाती गवंडी
हेरवाड गावाने महाराष्ट्रात विधवा प्रथेविरोधात घेतलेला ठराव अभिनंदनीय असा होता. त्याचं अनुकरण करुन आम्हाला वाटले की कोरगाव गावात आमच्या गावातून असा विधवा प्रथेविरोधात ठराव घ्यावा. महिलाना समाजात पतीच्या निधनानंतर सन्मानाने जगता येण्यासाठी आपण हा ठराव मांडला. आता संपूर्ण गोव्यात प्रत्येक गावागात विधवा प्रथेविरोधात आवाज उठवला पाहिजे. यासाठी सर्व गोव्यातील महिला, स्वयंसेवा गट, महिला गट, तसेच पुरुषांनी सहकार्य करून आपल्या गावातही आणि पंचायतीमार्फत तसेच पालिकातर्फे ठराव मांडून ते संमत करून घ्यावे,असे स्वाती गवांडी म्हणाल्या.
विधवा महिलांना सन्मानाने वागणूक द्यावी : विनिता मांद्रेकर
स्वाती गवंडी यांनी हा ठराव मांडला याचा आम्हाला अभिमान आहे. यापूर्वी अशा प्रकारचा कोणी ठराव मांडला नाही आणि तो सर्व प्रथम आमच्या पंचायत क्षेत्रातील आणि माजी सरपंच स्वाती गवंडी यांनी मांडल्याबद्दल त्यांचे आपण अभिनंदन करते. आज महिला सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत मात्र त्यांना पतीच्या निधनानंतर आणि अंत्यविधी वेळी मिळणारी वागणूक खरोखरच दुःखदायक आणि क्लेशदायक आहे. यापुढे अशा प्रकारची वागणूक न देता त्यांना या समाजात इतर महिलांसारख्या मानसन्मानाने वागणूक द्यावी असे विनिता मांदेकर म्हणाल्या.
विधवांबाबत ठरावाचे कायद्यात रूपांतर व्हावे : कृष्णा पालयेकर
महाराष्ट्रातील हेरवाड पंचायतीने घेतलेला निर्णय ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे. मात्र या निर्णयाचे कायद्यात रूपातर झाले तर चांगली बाब ठरणार आहे. पेडणे तालुक्मयातील कोरगाव आणि धारगळ ग्रामपंचायतीने विधवा प्रथेविरोधात ठराव मंजूर करून गोव्यातील पहिल्या दोन पंचायती विधवा प्रथेविरोधात ठराव घेणाऱया ठरलेल्या आहेत. ही पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी आमचे या चळवळीला सहकार्य असल्याचे नवाचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर म्हणाले.
हेरवाड गावाने विधवा प्रथेविरोधात घेतलेल्या ठरावाचे संपूर्ण देशभर स्वागत होत असताना त्याचे पडसादही सर्वत्र चांगल्या तऱहेने उमटत आहेत. गोव्यातही याच प्रकारची चळवळ व्हावी आणि विधवा महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी आपण स्वाती गवंडी यांनी मांडलेल्या ठरावाचे अभिनंदन करतो. या पुढे अशाच प्रकारचे ठराव इतर पंचायत, नगरपालिका आणि गोव्याच्या विविध भागातील तालुक्मयात मांडावे. जेणेकरून विधवा महिलेला पतीच्या निधनानंतर सन्मानाने जीवन जगता येण्यासाठी मदत होईल, असे कृष्णा पालयेकर म्हणाले.