Tarun Bharat

मेयर्सच्या नाबाद शतकामुळे विंडीज सुस्थितीत

Advertisements

वृत्तसंस्था/ ग्रोस आयलेट (सेंट लुसिया)

काईल मेयर्सच्या शानदार नाबाद शतकाच्या जोरावर येथे सुरू असलेल्या दुसऱया क्रिकेट कसोटीत खेळाच्या दुसऱया दिवसाअखेर बांगलादेशविरूद्ध विंडीज संघाची पहिल्या डावात स्थिती मजबूत झाली आहे. मेयर्स 126 धावांवर खेळत आहे.

दोन सामन्यांची ही कसोटी मालिका विंडीजचा संघ एकतर्फी जिंकण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या मालिकेतील पहिली कसोटी विंडीजने जिंकून आघाडी घेतली आहे. या दुसऱया सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव 234 धावात आटोपला. त्यानंतर विंडीजने बिनबाद 67 या धावसंख्येवरून दुसऱया दिवशीच्या खेळाला पुढे सुरूवात केली आणि दिवसअखेर त्यांनी 109 षटकांत 5 बाद 340 धावा जमवित बांगलादेशवर 106 धावांची आघाडी मिळविली होती.

विंडीजच्या डावाला कर्णधार ब्रेथवेट आणि कँपबेल यांनी दमदार सुरूवात करून देताना सलामीच्या गडय़ासाठी 100 धावांची भागिदारी केली. कँपबेलने 6 चौकारांसह 45 तर कर्णधार ग्रेग ब्रेथवेटने 7 चौकारांसह 51 धावा जमविल्या. रिफेरने 3 चौकारांसह 22 धावा केल्या. बॉनेर खाते उघडण्यापूर्वी झेलबाद झाला. विंडीजची स्थिती यावेळी 4 बाद 132 अशी होती. मेयर्स आणि ब्लॅकबूड यांनी संघाचा डाव सावरताना पाचव्या गडय़ासाठी 116 धावांची भागिदारी केली. मेयर्सने कसोटीतील आपले दुसरे शतक झळकविले. ब्लॅकवूडने 6 चौकारांसह 40 धावा जमविल्या. तो बाद झाल्यानंतर मेयर्स आणि डिसिल्वा यांनी सहाव्या गडय़ासाठी अभेद्य 92 धावांची भागिदारी केली. मेयर्स दोन षटकार आणि 15 चौकारांसह 126 तर डिसिल्वा 3 चौकारांसह 26 धावांवर खेळत आहे. बांगलादेशतर्फे खलीद अहमद आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी दोन तर एस.इस्लामने 1 गडी बाद केला. गेल्या फेब्रुवारीमध्ये चित्तगाँग येथे झालेल्या बांगलादेशविरूद्धच्या कसोटी सामन्यात मेयर्सने नाबाद द्विशतक (210) झळकावून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश प. डाव-64.2 षटकांत सर्वबाद 234, विंडीज प. डाव 106 षटकांत 5 बाद 340 (मेयर्स खेळत आहे 126, डिसिल्वा खेळत आहे 26, बेथवेट 51, कँपबेल 45, रिफेर 22, ब्लॅकवूड 40, खलीद अहमद 2-77, मेहदी हसन मिराज 2-68, एस. इस्लाम 1-67

Related Stories

पहिला सामना जिंकून न्यूझीलंडची मालिकेत आघाडी

Patil_p

‘रनमशिन’ जो रुटने रचला नवा इतिहास

Patil_p

पराभव अफगाणचा, हार भारताची!

Patil_p

भारतीय क्रिकेट संघ उद्यापासून 14 दिवस क्वारंटाईन

Patil_p

ऑस्ट्रेलियाच्या विजयात ऍगरची विक्रमी गोलंदाजी

Patil_p

ऍशेस मालिकेसाठी इंग्लंड संघात स्टोक्सचा समावेश

Patil_p
error: Content is protected !!