तरुण भारत

विजेत्या टेबल टेनिसपटूंना आता समान बक्षीस रक्क्म

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशामध्ये होणाऱया विविध वयोगटातील राष्ट्रीय विभागीय टेबल टेनिस स्पर्धांमधील पुरूष आणि महिला विजेत्या टेबल टेनिसपटूंना यापुढे समान बक्षिसांची रक्कम दिली जणार आहे. अखिल भारतीय टेबल टेनिस फेडरेशनच्या प्रशासकीय कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisements

भारतामध्ये विविध वयोगटातील राष्ट्रीय आणि विभागीय टेबल टेनिस स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धेमध्ये विजेत्यांसाठी रोख रक्कमेची बक्षिसे दिली जातात. यापूर्वी पुरूष आणि महिलांच्या विभागातील विजेत्यांच्या बक्षिसामध्ये फरक जाणवत होता. यापुढे अशा स्पर्धांमध्ये पुरूष आणि महिला यांना समान हक्क मिळावे या दृष्टीकोनातून फेडरेशनने बक्षीस रक्कम समान ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 2022 च्या टेबल टेनिस हंगामातील झालेल्या विविध वरिष्ठांच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकेरीतील विजेत्यांना पुरूष विभागात 2.75 लाख रूपये तर महिलांच्या विभागात 1.80 लाख रूपयांची बक्षिसे देण्यात आली होती. अलिकडे 83 वी वरिष्ठांची राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा शिलाँगमध्ये झाली. या स्पर्धेनंतर फेडरेशनने वरील निर्णय घेतला आहे.

Related Stories

जोकोविच नवव्यांदा ऑस्ट्रेलियात अजिंक्य

Patil_p

आयपीएल स्पर्धेत रायडूच्या 4000 धावा

Patil_p

गांगुली यांच्यावर लवकरच दुसरी ‘अँजिओप्लॅस्टी’

Patil_p

देशभरात ‘चक दे इंडिया’! इतिहासाची नोंद केलेल्या भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव

Rohan_P

क्रिकेटपटूंना आणण्यासाठी चार्टर विमाने वापरा : ब्रॅड हॉग

Patil_p

उस्मान ख्वाजाचा दोन्ही डावात शतकांचा पराक्रम

Patil_p
error: Content is protected !!