Tarun Bharat

नव्या संसद भवनात होणार हिवाळी अधिवेशन

18 जुलैपर्यंत बहुतांश काम पूर्ण होणार : केंद्रीय मंत्री पुरी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

केंद्रीय शहरविकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत विजय चौकपासून इंडिया गेटपर्यंतचे कार्य 18 जुलैपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती दिली आहे. सध्या एक किंवा दोन अंडरपासच्या ठिकाणी किरकोळ कामे सुरू असून ती लवकरच पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले. प्रकल्पाचे काम पाहता हिवाळी अधिवेशन नव्या संसद भवनात होण्याची शक्यता आहे.

सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाच्या अंतर्गत त्रिकोणी आकारातील नवे संसद भवन, एक संयुक्त केंद्रीय सचिवालय, विजय चौकपासून इंडिया गेटपर्यंत तीन किलोमीटर लांबीच्या राजपथचा कायापालट, नवे पंतप्रधान निवासस्थान, पंतप्रधान कार्यालय आणि उपराष्ट्रपतींचे निवासस्थान निर्माण करण्यात येणार आहे.

सेंट्रल व्हिस्टा ऍव्हेन्यू पुनर्विकास प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण जाले आहे. हा प्रकल्प 15 किंवा 18 जुलैपर्यंत पूर्ण होणार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

सेंट्रल व्हिस्टा ऍव्हेन्यू प्रकल्पाच्या अंतर्गत पुनर्विकसित राजपथावर प्रजासत्ताक दिन संचलन आयोजित करण्याचे लक्ष्य प्राप्त करण्यात आले आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडकडून तयार करण्यात येत असलेल्या नव्या भवनात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या संसद भवनाच्या काही हिस्स्यांवर 26 नोव्हेंबर म्हणजेच राज्यघटना दिनापर्यंत काम सुरू राहू शकते असे समजते.

Related Stories

PM मोदी अहंकारी; राज्यपालांचा दावा

datta jadhav

गुजरातमध्ये पूरसदृश्य परिस्थिती, बचावकार्य सुरु

Archana Banage

चेन्नईतील 697 टन अमोनियम नायट्रेटचा ई-लिलाव

datta jadhav

निर्भयाच्या पालकांचा आक्रोश

Patil_p

सहा कोटी वर्षांपूर्वीच्या खडकस्तंभाचा शोध

Patil_p

18 वर्षांनी हैदराबादमध्ये भाजप कार्यकारिणी बैठक

Patil_p
error: Content is protected !!