Tarun Bharat

बसमध्ये चढताना महिलेचे साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात लांबवले

Advertisements

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी

सांगली फाटा येथे आराम बसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधील साडेपाच तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात लांबवले. याची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की श्रद्धा गावडे या नांदेड येथे राहतात. त्या १७ एप्रिल रोजी रात्री नऊच्या सुमारास सांगली फाटा येथे आरामबसच्या प्रतिक्षेत उभ्या होत्या. त्यावेळी त्यांच्याकडे पर्स होती. त्या पर्समध्ये त्यांनी साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठन, तीन ग्रॅमची नथ आणि दीड तोळ्याचा नेकलेस असे एकूण २ लाख ८९ हजार रूपये किमंतीचे दागिने होते. बस आल्यानंतर त्यामध्ये चढत असताना चोरट्याने त्यांच्या पर्समधील दागिने हातोहात लांबवले. याबाबतची फिर्याद गावडे यांनी काल दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

शेतकऱ्यांना भीक नको त्यांच्या हक्काची मदत त्वरीत द्या – समरजितसिंह घाटगे

Abhijeet Shinde

राधानगरीच्या जंगलात वाघाचे दर्शन

Abhijeet Shinde

आपला रंकाळा आपणच वाचवूया…

Kalyani Amanagi

बार बंद करण्याच्या कारणावरुन कर्मचाऱ्याला मारहाण

Abhijeet Shinde

कोल्हापूर : राधानगरीच्या क्रांतीने बनविल्या टाकाऊ वस्तुपासून अनेक प्रतिकृत्या

Abhijeet Shinde

शिवाजी विद्यापीठाचा ४१ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे उद्घाटन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!