चप्पलाची साइज जाणून व्हाल चकित
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये राहणाऱया तान्या हर्बटने स्वतःच्या पायांमुळे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःचे नाव नोंदविले आहे. जगातील कुठल्याही महिलेचे पाय इतके मोठे नाहीत. हर्बर्टच्या उजव्या पायाचे माप जवळपास 33.1 सेंटीमीटर आहे. तर डाव्या पायाचे माप 32.5 सेंटीमीटर आहे. तान्या हर्बर्ट 18 नंबरचे चप्पल किंवा बूट वापरते. याचबरोबर तिची उंच जवळपास 6 फूट 9 इंच इतकी आहे. तुर्कियेतील रुमेयसा गेल्गीपेक्षा तिची उंची केवळ 3 इंचाने कमी आहे. गेल्गी 7 फूट 0.7 इंच उंचीची आहे.
बूट किंवा शूज खरेदी करण्यासाठी हर्बर्टला मोठी मेहनत करावी लागते. 18 नंबरच्या पादत्राणांसाठी तिला अनेक स्टोअर्समध्ये जावे लागते. हायस्कुलमध्ये माझे पाय विक्रमी लांबीच्या आकारापर्यंत पोहोचले होते असे हर्बटने सांगितले आहे. परंतु हर्बर्ट स्वतःच्या सकारात्मक पालनपोषणामुळे स्वतःच्या असामान्य शारीरिक स्थितीवरून कधीच असुरक्षित नव्हती.
पालकांचा पाठिंबा
माझ्या आईवडिलांनी मी मोठी झाल्यावर मला धीर दिला. याचमुळे माझ्या शरीराकडे मी कधीच एक वाईट गोष्ट म्हणून पाहिले नाही. माझ्या उंचीसाठी मला कुणी काही म्हटल्याची घटना कधीच घडली नाही. माझ्या मित्रांनी माझी काळजी घेतली, माझ्यावर प्रेम केल्याचे हर्बटने सांगितले आहे.
पादत्राणांचा आकार
तान्या नेहमीच पुरुषांच्या लोफर्स किंवा टेनिस शूज खरेदी करायची. स्वतःच्या पायांना त्यात फिट करण्यासाठी त्यांना काहीसे लांब करण्यासाठी बदल करायची. महिला 12 किंवा 13 नंबरच्या पादत्राणांचा वापर करताना संघषं करतात. परंतु मी 18 नंबरची पादत्राणे वापरते. पुरुषांच्या आकाराची पादत्राणे सहजपणे उपलब्ध होतात, परंतु महिलांबाबत हे केवळ अशक्य ठरते तसेच अत्यंत महागडे देखील असते. कंपन्यांनी मोठय़ा आकाराची पादत्राणे तयार करावीत अशी माझी इच्छा असल्याचे तान्याने म्हटले आहे.