प्रतिनिधी/ म्हसवड
म्हसवड, येथील माण देशी फौंडेशनचे कार्य सातासमुद्रापार गेले आसुन त्यांच्या कामाची व कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, हे फौंडेशन शासन आणि सामान्य लोक यांच्यामधील दुवा म्हणून सेवा करत आहे आणि याचा फायदा या माण ा खटाव दुष्काळी भागातील मोठय़ा संख्येने माण देशी जनतेला होत आहे येथील मेगा सिटी येथे माण देशी फौंडेशनने उभारलेल्या डायग्नोटिस्क सेंटर व हेल्थ केअर सेंटरचे उद्धघाटन जिल्हाधिकारी जयवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन संस्थेच्या संचालिका सौ सोनियाताई गोरे, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ सुरेश भोसले, Aम्महूल्rा चे वरिष्ठ संचालक महेश झुरळे, सातारा जिह्याचे सिव्हिल सर्जन सुभाष चव्हाण, प्रांत अधिकारी शैलेश सुर्यवंशी,माणचे तहसीलदार सूर्यकांत येवले माण देशी फौंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा माण देशी चॅम्पियन्स अध्यक्ष प्रभात सिन्हा,
माणदेशी फौंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ रेखा
कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, पालिका मुख्याधिकारी सचिन माने, मेढा वेल फियर चे अध्यक्ष धनराज शिंदे, माण देशी फौंडेशनच्या सीईओ वनिता शिंदे डॉ धवल, डॉ अल्फा, डॉ सचिन, डॉ महादेव कापसे, जवाहर देशमाने, करण सिन्हा, डॉ उज्वलकुमार काळे, डॉ राजेंद्र मोडासे, देवापुरचे सरपंच शहाजी बाबर तसेच माण तालुक्यातील सर्व सरपंच आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका व मदतनीस आदी मान्यवर उपस्थित होते
या कार्यक्रमात डॉ. सुरेश भोसले प्रमुख पाहुणे पदावरुन बोलताना म्हणाले की आरोग्य ही माणसाची सगळ्यात मोठी प्राथमिक गरज आहे. याबाबत सर्वांनीच जागरूक राहिले पाहिजे. श्रीमती चेतना सिन्हा यांचे काम खूप मोठे आहे व ते नेहमीच आम्ही न्यूज,पेपर मधून वाचत असतो. आज ते जवळून पाहता आले यांचा आनंद झाला असे त्यांनी सांगितले.
यावेळी Aम्महूल्rा चे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक महेश झुरळे म्हणाले की माण देशी बरोबर काम करत असताना आम्हाला अभिमान वाटतो. आज आम्हाला माणदेशी मुळे समाजातील शेवटच्या घटकासाठी काम करता येते.
यावेळी श्रीमती चेतना सिन्हा म्हणाल्या की, आजही ग्रामीण भागातील महिला या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष करतात आज माण देशातील बहुतांश महिलांना बीपी, शुगर या सारखे आजार आहेत म्हणून माण देशी ने आरोग्य मध्ये काम करण्याचे ठरविले.तसेच यापुढे माण देशी आणि द्वारा या दोन्ही संस्था आरोग्यमध्ये एकत्र काम करणार आहेत याची घोषणा यावेळी केली. तसेच हे सेंटर उभे करण्यासाठी Aम्महूल्rा आणि aर्जे त्याचबरोबर डॉ सुरेश भोसले, डॉ अल्फा, डॉ धवल यांची खूप मदत झाली असे त्यांनी सांगितले.
या उद्घाटन प्रसंगी कोविडमध्ये कोरोना योध्ये म्हणून काम
बजावलेले माण देशातील आशा वर्कर अगनवाडी सेविका, सरपंच यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनघा कामत तर आभार प्रदर्शन माण देशी बँकेच्या सीईओ रेखा कुलकर्णी यांनी मानले. यावेळी परिसरातील सर्व डॉक्टर माण देशी स्टाफ आणि ग्रामस्थ महिला मोठय़ा संखेने उपस्थित होत्या