Tarun Bharat

वेलसांव भागात रेल्वे विकास निगमचे काम गोंयचो एकवोटने रोखले

प्रतिनिधी /वास्को

वेलसावच्या रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी कुंपण घालून पारंपरीक वाट बंद करण्यासाठी आलेल्या रेल्वे विकास निगमच्या कामगारांना माघारी परतावे लागले. गोंयचो एकवोटच्या कार्यकर्त्यांनी या कुंपणास आक्षेप घेतल्याने रेल्वेला हे काम करता आले नाही.

Advertisements

रेल्वे विकास निगम लिमिटेडने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराचे काही कामगार बुधवारी वेलसांव येथील क्रॉसिंगच्या ठिकाणी कुंपण घालून रस्ता बंद करण्यासाठी क्राँक्रिटचे खांब घेऊन आले होते. आता असलेल्या एक पदरी रेलमार्गाच्या बाजुने हे कुंपण उभारण्यात येणार होते. परंतु स्थानिक लोकांना व गोंयचो एकवोटच्या कार्यकर्त्यांना ही महिती मिळाल्याने त्यांनी घटनास्थळी येऊन हे काम रोखले. त्यामुळे त्या कामगारांना आणलेले साहित्य पुन्हा वाहनामध्ये घालून माघारी जावे लागले. सदर कुंपण हे रेल मार्ग दुपदरीकरणाच्या कामाचाच भाग आहे. रेल्वे दुपदरीकरण कामाच्या जमीनीचा प्रश्न सध्या न्याय प्रविष्ठ असल्याने या भागातील कामाला हात घालणे योग्य होणार नसल्याचे संबंधीत कंत्राटदार व कामगारांना गोंयचो एकवोटच्या कार्यकर्त्यांनी बजावले.

Related Stories

वाठादेव सर्वण येथील खुनप्रकरणी पतीला अटक

Patil_p

राज्यातील भाजपचे सरकार दिशाहीन

Patil_p

केपेतील कोरोनाबाधितांच्या संख्येत भर

Patil_p

‘प्रोग्रेसिव्ह प्रंट’च्या कार्यकर्त्यांना अटक

Omkar B

‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा’च्या अंतर्गत सर्वांगीण विकास साधणार

Patil_p

मडगावातील सुलभ शौचालयाला सुक्या कचऱयाचा विळखा

Patil_p
error: Content is protected !!