Tarun Bharat

वेळगे श्री सातेरी युवा संघाचे कार्य उल्लेखनीय

Advertisements

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : बाये सुर्लात सरस्वती पूजन  

प्रतिनिधी /सांखळी 

सांखळी मतदारसंघातील वेळगे सारख्या गावातून श्री सातेरी युवा संघ आणि सांस्कृतिक मंडळ सलग दहा वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सभागृहात दुर्गापूजन उत्सव आणि दांडिया कार्यक्रम आयोजित करत आहे. संघाकडून अखिल गोवा पातळीवर दांडिया व गरबा नृत्य सादर  होत असून यात त्यांना बक्षीसे ही प्राप्त झाली आहेत.  या संघातील संघटितपणा महत्त्वाचा असून संघाचे कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. 

 गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते यांचे ही त्यांना  नेहमी सहकार्य लाभते. सामाजिक कार्यकर्त्या सुलक्षणा सावंत यांनी ही सातेरी युवा संघाच्या कार्याचे कौतुक केले.

 सातेरी युवा संघात विराज घाडी, निप्तेश नाईक, देविका घाडी, साहर्ष च्यारी, संघर्ष च्यारी, सत्यम च्यारी, साहिल प्रियोळकर, तृप्तेश आमोणकर, शुभम गावकर, हर्षदा घाडी, सोनम गावकर, संजना गावकर, सानिका मयेकर, सानिका हळवलकर, वैष्णवी वेरेकर, सिद्दीका वेरेकर, प्रियांका कांबळी, मालविका कारपूरकर, अलिशा कारापूरकर, निकिता नाईक, शारदा कडेकर, रोहन वेळगेकर, गंधिता वेळगेकर, साहिशा पाटय़ेकर यांचा सहभाग आहे.

बाये लक्ष्मीनारायण मंदिरात उद्या दांडिया

बाये सरकारी प्राथमिक शाळा आणि सरस्वती पूजन समितीतफ्xढ  लक्ष्मी नारायण मंदिरात पाच दिवस सरस्वती पूजन कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या निमित्त मंगळवार दि. 4 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी  7 वाजता दांडिया नृत्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात वेळगे येथील सातेरी युवा संघ आणि सांस्कृतिक मंडळ नृत्य सादर करणार आहेत. यावेळी सरपंच विश्रांती सुर्लकर, उपसरपंच भोला खोडगिणकर,वेळगे सरपंच सामंता कामत,उपसरपंच दुर्गादास नाईक, पत्रकार सुरेश बायेकर स्थनिक पंच दिनेश मडकईकर,,शोभा फळदेसाई ,दामोदर बर्वे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Related Stories

काणकोणात लसीकरणासाठी जनसेनेतर्फे वाहनाची सोय

Amit Kulkarni

भगतसिंग कोश्यारी राज्यपालपदी शपथबद्ध

Omkar B

सर्वांगीण विकासासाठी ‘व्हिजन काणकोण’ची संकल्पना : रमेश तवडकर

Amit Kulkarni

संचारबंदीत 26 पर्यंत वाढ

Amit Kulkarni

फोंडय़ात 12 हजारांचा गांजा जप्त

Patil_p

पणजीत 17 पासून चित्रकला पोट्रेट मार्गदर्शन शिबिर

Amit Kulkarni
error: Content is protected !!