प्रतिनिधी /बेळगाव
बिम्स् आवारात सुपरमल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यात येत असून लवकरच त्याचे काम पूर्ण होणार आहे. 140 कोटी रुपये खर्चून हे हॉस्पिटल बांधण्यात येत आहे. या चार मजली हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये न्युरॉलॉजीक, न्युरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी व इंडोक्लोनोलॉजी हे विभाग पहिल्या मजल्यावर असतील. तिसऱया मजल्यावर व्हीआयपी कक्ष व चौथ्या मजल्यावर ऑपरेशन थिएटर असेल.
आमदार अनिल बेनके यांनी या हॉस्पिटलची मंगळवारी पाहणी केली व लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे, अशी सूचना केली. या ठिकाणी प्रसूती विभाग, ट्रॉमा सेंटर आणि नर्सिंग कॉलेजही सुरू होणार असल्याचे सांगून गोवा-महाराष्ट्रातील रुग्णांसाठीही हे हॉस्पिटल मोफत असेल, असे ते म्हणाले.