Tarun Bharat

‘पणजी स्मार्ट सिटी’ची कामे 31 मार्चपर्यंत होणार पूर्ण

मनपाची आज स्मार्ट सिटी कामांबाबत बैठक

प्रतिनिधी /पणजी

पणजीत सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नुकतीच संबंधित खात्यांचे प्रमुख आणि उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांसोबत बैठक झाली. या बैठकीत 31 मार्चपर्यंत सर्व स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय स्मार्ट सिटीची कामे वेळेत कशाप्रकारे पूर्ण करता येतील याबद्दल आखणी करण्यासाठी आज बुधवार दि. 7 रोजी स्मार्ट सिटीचे कार्यकारी अधिकारी आणि पोलिस खात्यासोबत बैठक होणार आहे, अशी माहिती पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

दि. 11 रोजी पणजीत भरणारी फेरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोवा भेटीमुळे काही दिवस पुढे ढकलण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोवा भेटीच्या चार दिवसानंतर पणजीत फेस्ताचे आयोजन करण्यात येईल. पणजीची फेरी ही रद्द करण्यात आलेली नाही. पणजी चर्चची पारंपारिक दुकाने असतील. परंतु पूर्ण फेरी 12 किंवा 13 रोजी चार दिवसांकरिता भरण्यात येईल. चर्च स्क्वेअर याठिकाणी चर्चची दुकाने थाटण्यात येतील.

Related Stories

सांखळी परिसरात नाताळ सण उत्सहात साजरा

Amit Kulkarni

नाटय़कलाकार राजदीप नाईक यांच्या कारगाडीच्या काचा फोडल्या

Amit Kulkarni

गोव्यातील सर्व मुस्लिम बांधवाना भाजपात आणणार

Omkar B

सामान्य लोकांसाठी 100 कोटींचे पॅकेज द्यावे

Patil_p

तिस्क पीडीए मार्केटमधील व्यापाऱयांच्या डोक्यावर टांगता धोका

Amit Kulkarni

होडारकर यांच्या काँग्रेस प्रवेशाने भाजपाला कसलाही फरक नाही

Amit Kulkarni