ग्राहकांच्या शरीरावर फिरू लागतात साप
बहुतांश लोकांनी जगभरात पाळीव प्राण्यांसाठी अनुकूल कॅफेंबद्दल ऐकले असेल. परंतु पहिल्यांदाच मलेशियात आता जगातील पहिला रेप्टाइल कॅफे निर्माण करण्यात आला आहे. डेकोरीकडून फेंग मलेशियन रेप्टाइल पेमी याप मिंग यांगच्या मालकीचा एक प्रीमियम रेप्टाइल कॅफे आहे. या ऍनिमल-थीमयुक्त कॅफेत येणारे लोक अन्य प्राण्यांप्रमाणे साप अन् पालींना महत्त्व देणे शिकतील अशी अपेक्षा यांग यांनी व्यक्त केली आहे. हा कॅफे देशाची राजधानी क्वालांलपूरच्या बाहेरील भागात आहे. कॅफेच्या काचेच्या टँकमध्ये अनेक प्रकारचे प्राणी ठेवण्यात आले आहेत. हे प्राणी मलेशियात आढळत असून यात सापांचा देखील समावेश आहे. ग्राहक ड्रिंक्स आणि जेवणाची ऑर्डर देताना या प्राण्यांना हाताने पकडतात. लोक केवळ मांजर, श्वान आणि अशाच प्रकारच्या पाळीव प्राण्यांची पर्वा करतात. परंतु लोक नेहमीच रेप्टाइल्स किंवा सापांना वाऱयावर सोडून देतात. रेप्टाइलला पाळीव करता येत नसल्याचे लोकांचे मानणे असल्याचे मिंग यांनी म्हटले आहे.कॅफेचा मालक हा मलेशियातील एका समुदायाचा हिस्सा असून तो सरपटणाऱया प्राण्यांबद्दल स्वारस्य बाळगणारा आहे. जपानमध्ये एक कॅफे स्वतःच्या ग्राहकांना स्वतःच्या परिसरातील एका तलावात मासेमारी करण्याची अनुमती देतो. ओसाकामध्ये जौओ रेस्टॉरंट लोकांना नौकेत बसून मासेमारीचा अनुभव घेण्याची सुविधा प्रदान करते. ग्राहकाने मासा पकडल्यास रेस्टॉरंट त्याच्या यशाचा जल्लोष करण्यासाठी एक घोषणा करते. तसेच रेस्टॉरंटमध्ये माशासोबत ग्राहकाचे छायाचित्र काढले जाते. त्यानंतर ग्राहकाची पसंती विचारात घेत या माशाचा वापर करत खाद्यपदार्थ तयार केले जातात.