नवी दिल्ली :
जगातील पहिल्या यादीमधील श्रीमंतांना गुरुवार हा नुकसानदायी गेला. यामध्ये वॉरेन बफेट आणि मुकेश अंबानी यांना वगळता अन्य सर्व श्रीमंतांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे. यामध्ये श्रीमंतांच्या संपत्तीत एका दणक्यात 43 अब्ज डॉलर्स रुपयांची घसरण झाली असल्याची माहिती आहे. यामध्ये सर्वाधिक फटका हा टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांना बसला असून त्यांची संपत्तीही जवळपास 20.3 अब्ज डॉलरनी घसरली आहे. जेफ बेजोस यांना 5.32 अब्ज डॉलरचा दणका, तर मार्क झुकरबर्ग यांना 4.70 अब्ज डॉलरचा दणका बसला आहे. परंतु बफेना 1.25 अब्ज डॉलर व अंबानी यांची संपत्ती ही 1.19 अब्ज डॉलरने वाढली आहे. पहिल्या यादीमधील 15 अब्जाधीशांमधील फक्त तिघांची संपत्ती गुरुवारी वाढली आहे.
अब्जाधीश संपत्ती/घसरण व चढउतार
एलॉन मस्क 9.74 टक्के घसरण
बर्नार्ड अरनॉल्ट 1.57 टक्के घसरण
जेफ बेजोस 155 अब्ज डॉलरसोबत तिसऱ्या स्थानी
बिल गेट्स 138 अब्ज डॉलर चौथ्या स्थानी
लॅरी एलिसन 131 अब्ज डॉलर सह पाचव्या नंबरवर