दोडामार्ग – वार्ताहर
सासोली हेदुसवाडी येथील विवेक हरिश्चंद्र नाईक ( वय 28 ) याचा रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. विवेक हा गोव्यात एका खाजगी कंपनीमध्ये कामासाठी जात असे तसेच तो गणेशमूर्ती पेंटिंगचेही काम करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, लहान मुलगा, भाऊ असा परिवार आहे. विवेक याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी दिली. विवेक याच्या दुर्दैवी जाण्याने सासोली गावावर शोककळा पसरली आहे.