Tarun Bharat

जगभ्रमंती करणारा सर्वात तरुण वैमानिक

17 वर्षीय मुलाकडून 52 देशांचा प्रवास : 250 तास केले विमानाचे उड्डाण

जगभरात एकटय़ाने विमानोड्डाण करणाऱया सर्वात कमी वयाचा वैमानिक म्हणून सध्या नोंद असलेला विश्वविक्रम मोडीत काढल्यावर 17 वर्षीय मॅक रदरफोर्ड बुधवारी बुल्गारियाची राजधानी सोफिया येथे पोहोचला आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्याच्या कामगिरीची नोंद केली असून लँडिंगनंतर त्याला दोन प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली आहेत. रदरफोर्डने 23 मार्च रोजी सोफिया येथून उड्डाण केले होते. 52 देशांच्या माध्यमातून उड्डाण केल्यावर आणि सुमारे 250 तासांचा प्रवास केल्यावर त्याने बुधवारी बुल्गारियाच्या राजधानीत विमान उतरविले आहे.

आयसीडीसॉफ्टने प्रायोजकत्व स्वीकारल्याने रदरफोर्डला बुल्गारियातून प्रवास सुरू करावा लागला होता. 5 महिन्यांचा प्रवास अन् बुल्गारियातून प्रयाण अन् आगमन अत्यंत आश्चर्यजनक होते. हा एक अत्यंत रोमांचक प्रवास होता. प्रवासादरम्यान अनेक अडथळे आले, परंतु मी कधीच हार मानली नसल्याचे त्याने सांगितले आहे. बेल्जियम-ब्रिटिश एव्हिएटर रदरफोर्डचा जन्म 21 जून 2005 रोजी झाला होता. प्रवासादरम्यान तो 17 वर्षांचा होता.  वयाच्या 15 व्या वर्षी मला मायक्रोलाइट वैमानिकाचा परवाना मिळाला, यामुळे मी जगातील सर्वात कमी वयाचा वैमानिक ठरलो होतो असे सांगितले आहे.

Related Stories

Special Story; रणजी ट्रॉफी : मध्यप्रदेशचा बलाढ्य मुंबईवर विजय

Kalyani Amanagi

लोखंडी फुफ्फुसांमध्ये अलेक्झेंडरचे जग

Amit Kulkarni

77 वर्षीय इसमावर जडले 20 वर्षीय युवतीचे प्रेम

Patil_p

इराणमधील ‘मॅग्नेट मॅन’चा विश्वविक्रम

Patil_p

टाकाऊ सामग्रीपासून वाद्यांची निर्मिती

Patil_p

महागाईची ‘फोडणी’…

Patil_p