Tarun Bharat

प्रयाग चिखलीत ४ ठिकाणी चोरी, ३५ हजाराची रोकड लंपास

प्रयाग चिखली/वार्ताहर

Advertisements

Kolhapur Prayag Chikali Robbery : प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील पोस्ट ऑफिससह दोन दूध संस्था तसेच एका मॉल मध्ये चोरी झाली. यावेळी चोरट्यानी दोन्ही दूध संस्थेतील सुमारे ३१ हजार व तर पोस्ट ऑफिस व मॉल मधील चार हजार अशी सुमारे ३५ हजाराची रोकड लंपास केली. ही घटना बुधवारी (दि.२४) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सी.सी.टी.व्ही. फुटेज वरून स्पष्ट झाले आहे. या घटनेचा पंचनामा करवीर पोलिसांनी केला व पुढील तपास करत आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, प्रयाग चिखली येथील मुख्य चौकामध्ये असलेल्या जी. डी. पाटील सहकारी दूध संस्था व जी. डी. पाटील मॉल तसेच येथील मेन रोडवरील पोस्ट ऑफिस तसेच याच इमारतीतील संत ज्ञानेश्वर सहकारी दूध संस्थेच्या कार्यालयाच्या दरवाज्यांची कुलपे तोडून आत प्रवेश करून चोरी केली आहे. ही घटना साधारण बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यावेळी चोरट्याने जी. डी. पाटील दूध संस्थेतील पंधरा हजार तर संत ज्ञानेश्वर दूध संस्थेतील सोळा हजार रोकड तसेच मॉल मधील चार हजार अशी सुमारे ३५ हजाराची रोकड लंपास केली. यावेळी चोरट्यांनी सर्वच ठिकाणच्या तिजोऱ्यांचे लॉक तोडून दप्तर ही विस्कटले आहे. चारही ठिकाणी दरवाजांची कुलपे तोडण्यात आली आहेत. या घटनेमुळे प्रयाग चिखली परिसरात खळबळ माजली आहे.

दरम्यान चोरट्यांचा शोध घेण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता चार चोरट्यांनी तोंडाला स्कार्फ बांधून चोरी केल्याने त्यांना ओळखणे कठीण झाले. सध्या ग्रामीण भागातील दूध संस्थांच्या वतीने ठेवी आणि दूध बिल वाटपसाठी दूध संस्थांच्या कार्यालयात पैशाची आवक- जावक मोठ्या प्रमाणावर होत असते त्याच अनुषंगाने चोरट्याने दूध संस्था फोडण्याचा बेत आखला असावा अशी चर्चा परिसरात सुरु आहे.

Related Stories

कबनुरात कोरोनाने घेतला पहिला बळी, दोन रुग्णांची भर

Archana Banage

मनपातील 600 कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Abhijeet Khandekar

सीमाबांधवांचा कोल्हापुरात एल्गार !

Archana Banage

यंदा विसर्जन मिरवणूकीस महाद्वाररोडवर ‘इंट्री’

Kalyani Amanagi

कोल्हापूर-हैद्राबाद विमानसेवा बंद, प्रवाशांची गैरसोय होणार

Archana Banage

कोल्हापूर : इचलकरंजीच्या माजी उपनगराध्यक्षाला उघड्यावर लघुशंका केल्याप्रकरणी दंड

Archana Banage
error: Content is protected !!