लोणावळा : पांगळोली गावातील प्रसिद्ध असलेल्या संत बाळूमामा मंदिरात सोमवारी पहाटे चोरी झाली. मंदिरातील दोन दानपेट्या फोडत चोरट्यांनी मोठा ऐवज लंपास केला आहे. माजी सरपंच व संत बाळूमामा देवस्थानचे विश्वस्त बबन खरात यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
लोणावळा शहरातील पांगळोली येथे संत बाळूमामा यांचे मंदिर आहे. हजारो भाविक दर्शनासाठी याठिकाणी येत असतात. नुकत्याच झालेल्या आषाढ अमावस्येला मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गत सहा महिन्यांपासून मंदिराच्या दानपेटीत दान जमा झाले होते. अज्ञात चोरट्यांनी या दानपेट्यांवर हात मारत चोरी केल्याने परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लोणावळा पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
हेही वाचा : सर्व पक्ष संपविण्याची भाजपाची भूमिका ही हुकूमशाहीच