गोकुळ शिरगाव वार्ताहर
गोकुळ शिरगाव ( ता. करवीर) येथील खापरे माळावरील बंद दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे . या घटनेची नोंद रोहित शंकर पाटील (वय 29) राहणार खापरेमाळ यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार शनिवारी रात्री अज्ञात चोरट्याने बंद दरवाज्याचे कुलूप तोडून यामध्ये साडेतीन तोळे सोन्याच्या बांगड्या, अडीच तोळे सोन्याचे गंठण, एक तोळा सोन्याचा नेकलेस, अर्धा तोळे कानातील वेल, चांदीचे पैंजण, रोख रक्कम 10,500 असा एकूण 3 लाख 31 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरांनी लंपास केला केला आहे. या घटनेचा तपास सहायक फौजदार एस .बी. सनदी करीत आहेत.