संशयित आरोपी पोलिसांच्या रडारवर; पोलिसांनी 24 तासाच्या आतच दागिने केले हस्तगत
संगमेश्वर वार्ताहर
गजबजलेल्या संगमेश्वर बाजारपेठेत राहत्या घरातील साडेसात लाख दागिन्यांची चोरी झाल्याची फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी 24 तासाच्या आतच दागिने घरातून हस्तगत केले आहेत.
वैशाली संजय राहटे (44, ब्युटीपार्लर, रा. नावडी बाजारपेठ) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात घरातील कपाटातील सोन्याचे सुमारे साडेसात लाखाचे दागिने चोरी झाल्याची फिर्याद संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली होती. यामध्ये 3,38,000 किंमतीची एक सोन्याचे मंगळसूत्र, दोन्ही बाजूस चैनी असलेल्या काळ्या तीन पदरी मण्यांची पेन्डन्ट असलेली रु. 9,6.000/ किंमतीचा सोन्याचा नेकलेस, त्याचे वजन 19 ग्रॅम 50 मिली अ त्यावर नक्षी असलेला हा नेकलेस रु. 1,05,000 किंमतीच्या सोन्याच्या दोन पाटल्या, पाटल्यांचे प्रत्येकी वजन ग्रॅम 50 मिली असून दोन्ही पाटल्यांचे वजन 31 ग्रॅम आहे रु. 1,86,000 किंमतीच्या सोन्याच्या सहा बांगड्या, त्यापैकी प्रत्येक बांगडी वजन 11 ग्रॅम असून 6 बांगड्यांचे वजन 66 ग्रॅम आहे. रुपये 25,000 रोख रक्कम त्यामध्ये 500 रुपयांच्या च्या 50 नोटां असे एकूण रुपये 7,50,000 चोरीला गेल्याचे म्हटले होते. राहत्या घरात झालेल्या चोरीमुळे खळबळ उडाली होती.
या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी वाघमारे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात भेट देत पोलिसांना मार्गदर्शन केले होते. त्यानंतर संगमेश्वर पोलिसांची पोलीस उपनिरीक्षक देशमुख पोलीस सचिन कामेरकर, किशोर जोयशी, आव्हाड, कांबळे, बरगाळे, शिंदे, पंदेरे यांनी तपास केला. तपासामध्ये चोरीला गेलेले दागिने घरातूनच हस्तगत केले आहेत. पोलिसांनी 24 तासाच्या आतच चोरीच्या छडा लावत दागिने हस्तगत केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.