फोंडा पोलीस स्थानकाच्या हद्दीत चोऱयाचे सत्र सुरूच : दिवसाढवळय़ा चोऱयाचे सत्रानंतर अंधारातही चोरटे सक्रिय
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा शहर परिसर, कुंडई, खांडेपार, मडकई व शिरोडा भागातून पोलीसांना चकमा देत दागिन्याची लुटमार केल्यानंतर चोरटयानी आपला मोर्चा सद्या ग्रामिण भागात वळविलेला आहे. दत्तगड बेतोडा येथे एका लग्नासमारंभासाठी हजर राहण्यासाठी आलेल्या हुबळी येथील नातेवाईकांच्या राहत असलेल्या खोलीतून सुमारे अडीच लाख रूपये किमती दागिने लांबविल्याचा प्रकार काल रविवारी सकाळी उघडकीस आला. फोंडा तालुक्यात मागील काही दिवसापासून चोऱयाचे सत्र सुरू असून फोंडा पोलिसांना चोरांच्या मुसक्या आवळण्यात अद्याप यश आलेले नाही.
प्राप्त माहितीनुसार दत्तगड बेतोडा येथे एका लग्नसमारंभाला हजर राहण्यासाठी हुबळी येथून नातेवाईक गोव्यात दाखल झाले होते. त्याना राहण्यासाठी तात्पुरती भाडय़ाने खोलीही लग्नमंडळीच्या घराजवळच घेतली होती. लग्नाचा कार्यक्रम दुसऱया दिवशी रविवारी असल्यामुळे आदल्या दिवशी लग्नस्थळावर हॉलची पाहणी व जेवण करण्यासाठी नातेवाईक दत्तगड येथील खोलीत किमती ऐवज दागिने ठेवून बाहेर पडले होते. नेमक्या याचवेळी मुख्य दरवाजाचे कुलुप तोडून अज्ञात चोरटय़ानी सुमारे अडीच लाख रूपये किमतीचे दागिने लंपास करून पळ काढल्याचा संशय व्य़क्त करण्यात येत आहे. हुबळी येथील नातेवाईकांना पोलीसांनी चोरीला गेलेल्या दागिन्याची बिले सादर करण्याची अट घातल्यामुळे चोरीची नोंदच नको असा पवित्रा त्या नातेवाईकांनी घेतल्याचे समजते. याप्रकरणी फोंडा पोलीसांनी पंचनामा केला असून उपनिरीक्षक रश्मी भाईडकर अधिक तपास करीत आहे. चोरीच्या घटनेच्या 200 मिटर अंतरावर मशिदीजवळ अन्य एकाच्या घरात घरगुती गॅस सिलेंडर व रोख रू. 3000 रक्कम लांबविली आहे. या खोलीत राहणारा मागील तीन दिवसापासून आपल्या जवळ असलेल्य़ा मोहेरी राहत होता. या भागातील पथदीप पेटत नाहीत व पोलीसांची गस्तही या भागात होत नसल्याच चोरटय़ाचे आयतेच फावत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
फेंडय़ात चोरांचा सुळसुळाट खांडेपार, मडकई, कुर्टी, फोंडा शहर, शिरोडया चोरटे मोकाट
मागील चार पाच दिवसापुर्वी दिवसाढवळय़ा न्यु हाऊसिंग बोर्ड कुर्टी येथे दुसऱयामजल्यावरील एका फ्लॅटात अज्ञात चोरटय़ांनी कुलुप तोडून प्रवेश घेत रू. 12 लाखाचे दागिने लांबविले होते. त्यानंतर वाजे शिरोडा येथे दुसऱया मजल्यावरील फ्लॅटात धाडसी चोरी करताना सुमारे रू. 20 लाखाचे दागिने चोरी केल्याचे तक्रार फोंडा पोलीस स्थानकात नेंदविण्यात आलेली आहे. मागील दोन महिन्यापुर्वी बोरी सर्कल येथील एका दुसऱयामजल्यावरील फ्लॅटात अज्ञातांनी चोरी करून लाखो रूपये किमतीचे दागिने लांबविले होते. बुधवार पेठ बाजार परिसरात पार्क करून ठेवलेली ज्युपिटर दुचाकीचा अजून पत्ता लागलेला नाही. जानेवारी महिन्यात फोंडा-बेळगांव महामार्गावर खांडेपार येथील ओपा रोड जन्क्शनजवळील सॉ मिल परिसरात रू 8 लाखाच्या सोन्याच्या दागिने लंपास केले होते. याप्रकरणी संशयित म्हणून बलत्याच निरपराधांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. मडकई येथील एका सहकारी संस्थेत अज्ञात चोरटय़ांनी प्रवेश घेत संस्थेचा लॅपटॉप व तीन हजार रूपयांची रोकड लांबविली होती. फोंडा शहरात कुडतरकर आर्केड येथे एका फ्लॅटात घुसून लाखो रूपयाची रोकड लांबविण्यात आली होती. कुंडई येथे पार्क करून ठेवलेली एक अवजड वाहनही चोरटयानी पळविललेला वाहनाचा शोध लागलेला नाही. फोंडा पोलिसांना आजपर्यंत घडलेल्या चोरीच्या घटनेचा छडा लावण्यात अपयश आलेले आहे. सद्या चोरटे फ्लॅटात कुणीच नसल्याचे साधत चोरी करण्याचे दिसून येत आहे. एखाद्या लग्नसमारंभ असलेल्या भागातही चोरटे सक्रिय झालेले आहे. दागिन्यावर आरामात उपलब्ध होणाऱया सुलभ कर्जामुळे व वाढलेल्या किंमतीमुळे चोरटयानी प्रत्येकवेळी फक्त दागिने लांबविण्यात येत असल्याचे चोरीच्या घटनेवरून दिसून येते.