Tarun Bharat

बेकिनकेरे येथे तीन शेळ्यांची चोरी

Advertisements

बेळगाव प्रतिनिधी – बेकिनकेरे – अगसगा मार्गावर असलेल्या एका गोठ्याचा दरवाजा तोडून तीन शेळ्या चोरांनी पळविल्या आहेत. बुधवारी दिवसाढवळ्या ही घटना घडली आहे. राजू सनदी असे शेळीमालकाचे नाव असून त्यांना 40 हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. घटनेची अधिक माहिती अशी की विजयादशमी निमित्त सनदी कुटुंबीय गावातील नागनाथ मंदिराकडे गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यानी समोरील दरवाजाने गोठ्यात प्रवेश करून पाठीमागील दरवाज्याने तीन शेळ्या पळविल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरटयांनी आता ग्रामीण भागातील शेळ्या- मेंढ्या, देखील लक्ष्य केल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. सदर घटनेचा तपास करून ग्रामीण भागात पोलीस तैनात करावेत, अशी मागणी होत आहे.

Related Stories

ऍपटेक एव्हिएशनतर्फे यशवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Amit Kulkarni

रेल्वेकडून सॅनिटायझर मास्कची निर्मिती

tarunbharat

खानापूर तालुका विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा

Patil_p

खानापूर बाजारात दिवाळीनिमित्त खरेदीला उधाण

Amit Kulkarni

हिरवा वाटाणा-हरभरा आवकेत वाढ

Amit Kulkarni

लोकमान्यच्या भाग्यनगर शाखेमध्ये महिला दिन

Amit Kulkarni
error: Content is protected !!