आणखी दोन ठिकाणी घरफोडी झाल्याचे आज उघड
मालवण/प्रतिनिधी-
मालवण शहरात बाजारपेठ मार्गावरील पाटकर कुटुंबियांची दोन घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना आज शनिवारी दिसून आली आहे. काल याच परिसरात काही अंतरावर तीन ठिकाणी घरफोडी झाली होती. हे पाहता चोरट्याने त्याच वेळी याही ठिकाणी डल्ला मारला असावा. स्मिता किशोर पाटकर कुटुंबीय बाहेरगावी असल्याने त्यांचे बंद घर चोरट्यांनी फोडले. घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा पिन चोरट्यांनी काढून टाकल्याचे दिसून आले. तर त्याच घरा बाजूला हनुमंत पाटकर यांचे स्टोअर रूम घर चोरट्यानी फोडल्याचे आज दिसून आले.
मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव व पोलीस पथक तसेच ओरोस येथील ठसे तज्ञ दाखल झाले आहेत.