तरुण भारत

बामणोलीत फेटलिंग शॉप फोडून सव्वा लाखाच्या कास्टींगची चोरी 

कुपवाड / प्रतिनिधी 

बामणोली (दत्तनगर) येथील फेटलिंग शॉप फोडून तब्बल सव्वा लाखाच्या कास्टींगची चोरी झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. मात्र, याबाबत रात्री उशिरापर्यंत कुपवाड पोलिसात नोंद झाली नव्हती.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बामणोलीतील सुखदेव फेटलिंग शाॅपचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी शॉपमधील १ लाख २५ हजार रुपये किंमतीच्या कास्टींगची चोरी केली. सुखदेव धन्नाप्पा व्हनमोरे यांच्या मालकीचे सुखदेव फेटलिंग शॉप आहे. सुखदेव यांनी कुपवाड एमआयडीसीतील बाश्को इंजिनिअरिंग या कंपनीतून फेटलिंग साठी १ लाख २५ हजार रुपये किंमतीचे कास्टींग आणले होते. गुरुवारी रात्री ९ वाजता सुखदेव शाॅपला कुलूप लावून बंद करून घरी गेले होते.गुरूवारी मध्यरात्री चोरट्यांनी शाॅपचे कुलूप तोडून कास्टींगची चोरी केली. शुक्रवारी सकाळी शाॅप उघडण्यासाठी आले असता शॉपचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी आत प्रवेश करून बघितले असता कास्टींगची चोरी झाल्याचे दिसून आले.

Advertisements

Related Stories

ओडिशात आरोग्य कर्मचाऱ्यांचे 14 दिवस सक्तीचे विलगीकरण

prashant_c

पालघर प्रकरणात धार्मिक तेढ पसरवू नका : उध्दव ठाकरे

prashant_c

कोल्हापूर : कळंबा कारागृह अधीक्षकांवर कैद्याचा हल्ला

Abhijeet Shinde

संजय राऊत राहुल गांधींची भेट घेणार; शरद पवारांनीही बोलावली बैठक

Sumit Tambekar

सांगली : जिगरबाज आदित्यची झुंज ठरली अपयशी

Abhijeet Shinde

आघाडी सरकारच्या विरोधात भाजपचे 72 तास अन्नत्याग आंदोलन सुरू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!