Tarun Bharat

…तर राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी केली असती; गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

ऑनलाईन टीम / तरुण भारत : 

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी केली असती, असा गौप्यस्फोट पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मीडियाशी बोलताना केला. 

राष्ट्रवादीने यापूर्वीही पहाटेच्या वेळी भाजपसोबत शपथ घेतली होती. सकाळी कोंबडा बांग देतो तशी ती वेळ होती. राष्ट्रवादीचे 10 ते 12 आमदार फुटले आहेत. आता फक्त त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरायचा बाकी आहे. 

अधिक वाचा : मलिकांना धक्का; ईडी घेणार 8 मालमत्तांचा ताबा

शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. यावर पाटील म्हणाले, अधिवेशन संपलं आहे. पण सरकार कोसळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहावा आमदारांमध्ये फूट पडू नये, म्हणून राष्ट्रवादीकडून अशा प्रकारची विधाने केली जात आहेत. आमचं सरकार दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Stories

26 रोजी भारत बंदची हाक

Patil_p

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Patil_p

सकल मराठा क्रांतीचा कराडमध्ये मोर्चा

Patil_p

चंद्रकांत पाटील शाईफेकप्रकरणी 11 पोलीस निलंबित

datta jadhav

सातारा जिह्यात कोरोना केअर सेंटर सुरु

Omkar B

फलटण तालुक्यात परप्रांतीय युवकाची आत्महत्या

Patil_p