Tarun Bharat

मावळे असतात म्हणून राजे असतात, आमच्याकडून फाईल बंद: संजय राऊत

मुंबई: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक संजय पवार यांचे नाव निश्चित झाले आहे. यावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी, होय! संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे. मुख्यमंत्र्यांनी या मावळ्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. असे संजय राऊत म्हणाले आहेत.

मी पुन्हा एकदा सांगतो शिवसेना दोन्ही जागांवर निवडणूक लढवणार आहे. आणि या दोन्ही जागांवर शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल, असे संजय राऊत म्हणाले आहेत. कोल्हापूरचे संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे. पवार हे कडवट शिवसैनिक आहे. पक्का मावळा आहे. मावळे असतात म्हणून राजे असतात. पक्ष आणि नेते त्या मावळ्यांच्या जोरावर वर असतात. असेही राऊत म्हणाले आहे.

शिवसेनेच्या दृष्टीने राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारीचा चाप्टर क्लोज झाला आहे. आमच्याकडून फाईल बंद झाली आहे. असेही संजय राऊत म्हणाले. संभाजी राजे छत्रपती यांचा नेहमीच आम्ही आदर ठेवतो. त्यांच्या कुटुंबाविषयी, गादीविषयी आदर ठेवतो. त्यांच्याबद्दल कायम राहील. त्यांच्यासमोर शिवबंधन बांधण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र त्यांना अपक्ष लढायचे आहे. त्यांच्याकडे ४२ मते असतील तर त्यांनी निवडणूक लढवावी. असेही संजय राऊत म्हणाले.

Related Stories

“…तुम्हाला त्या प्रत्येक सेकंदाची किंमत चुकवावी लागेल”; संजय राऊत यांचा भाजपाला इशारा

Archana Banage

जय गणेश ज्ञानवर्धन अभियानातील विद्यार्थ्यांचा 12 वीचा निकाल शंभर टक्के

Tousif Mujawar

भाजपाने ठेकेदार पोसण्याचे काम बंद करावे

Patil_p

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Patil_p

मोठी बातमी : कोरोनामुळे आयपीएल स्थगित;बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांची घोषणा

Archana Banage

जैन सभेच्या कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन

Archana Banage