नवी दिल्ली
बँक नोटांवरील महात्मा गांधी यांचे चित्र बदलण्याचा कुठलाच विचार नसल्याचे केंद्र सरकारने मंगळवारी स्पष्ट केले आहे. अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल ही माहिती दिली आहे. काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह आणि अखिलेश प्रसाद सिंह यांनी याबाबत विचारणा केली होती. चलनी नोटांवर रविंद्रनाथ टागोर, सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे चित्र छापण्याचा विचार आहे का असा प्रश्न या खासदारांनी विचारला होता.