Tarun Bharat

कोणत्याही शब्दावर निर्बंध नाही

Advertisements

असांसदीय शब्दांबद्दल लोकसभेचे अध्यक्ष बिर्ला यांचा निर्वाळा

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

केंद्र सरकारने संसदेत बोलताना उपयोगात आणल्या जाणाऱया काही शब्दांवर बंदी घोषित केल्याचे वृत्त असत्य असल्याचे प्रतिपादन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले आहे. संसदेतील सर्व सदस्यांना त्यांच्या भावना सभागृहाच्या मानमर्यादा राखून कोणत्याही शब्दात व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्यावर कोठेही बाधा निर्माण करण्यात आलेली नाही. लोकप्रतिनिधींनी सभ्यतेच्या मर्यादा पाळून त्यांच्या भावना व्यक्त कराव्या, असे आवाहन त्यांनी केले.

निर्बंधित शब्दांमध्ये नुकतीच आणखी काही शब्दांची भर टाकण्यात आली आहे. त्यात निकम्मा, ऍशेम्ड् आदी शब्द समाविष्ट करण्यात आले आहेत. मात्र, असे करणे ही 1959 पासुनची परंपरा आहे. ती यावेळी पहिल्यांदा निर्माण झालेली नाही. आजवर प्रत्येक सरकारांनी असांसदीय शब्दांच्या सुचित त्यांच्या अनुभवानुसार भर टाकलेली आहे. तथापि संसदेच्या इतिवृत्तातून काही शब्द अथवा वाक्ये वगळण्याची उदाहरणे कमी आहेत, असे प्रतिपादन त्यांनी
केले.

लोकसभेच्या सचिवालयांनी नुकतीच एक पुस्तिका प्रसिद्ध केली असून त्यात जुमलाजिवी, बालबुद्धी, कोविड स्प्रेडर आणि स्नुपगेट तसेच ऍशेम्ड्, ऍब्युजड्, ब्रटाईट, तरफ, ड्रामा, हिपॉप्रसी आणि अकार्यक्षमता इत्यादी शब्दांची भर टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे बराच वाद निर्माण झालेला आहे. ओम बिर्ला यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येते.

Related Stories

मध्यप्रदेश : भोपाळमध्ये 31 मे पर्यंत कोरोना कर्फ्यू

Tousif Mujawar

कलह संपविण्याकरता काँग्रेसमध्ये हालचाली

Patil_p

देशात 15 जूनपासून पुन्हा लॉकडाऊन?

datta jadhav

दसरोत्सवही साधेपणाने साजरा करावा लागणार

Patil_p

समिती स्थापण्याची शेतकऱयांची तयारी

Patil_p

झारखंडचे आरोग्य मंत्री मिथिलेश ठाकूर यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar
error: Content is protected !!