तरुण भारत

शाहू ग्रुप मार्फत भव्य ‘राजर्षि छ. शाहू महाराज कागल मॅरेथॉन’ स्पर्धा

राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त आयोजन; शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची माहिती

कागल / प्रतिनिधी

येथील श्री शाहू ग्रुप, कागल( Shahu Group, kagal ) यांनी श्री छ. शाहू स्मृती शताब्दी वर्ष ( chh. Shahu Smriti Centenary Year ) २०२२ निमित्त विविध उपक्रमांनी साजरे करणेचे निश्चित केले आहे. त्या अंतर्गत रविवार दि ५ जून रोजी शाहू ग्रुप मार्फत भव्य ‘छ.शाहू महाराज मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन केले आहे, अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Smarjitयांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, श्री छ.शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त शाहू कृषी प्रदर्शन, व इतिहास संशोधक डॉ. बी डी खणे यांचे व्याख्यान असे दोन उपक्रम पार पडले असून,खुली मारोथॉन स्पर्धा हा तिसरा उपक्रम आहे.

मॅरोथॉन स्पेर्धेबाबत बोलताना ते म्हणाले, चार विविध गटांमध्ये या स्पर्धा होत असून, श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना प्रधान कार्यालय श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवन येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्या पासून सकाळी सहा वाजता या स्पर्धेस प्रारंभ होणार आहे.स्पर्धेचा ट्रॅक कारखाना प्रधान कार्यालय ते व्हन्नूर फाट्यावरून परत असा राहणार आहे.

खुल्या गटामध्ये पुरुषांसाठी दहा किलोमीटर तर महिलांसाठी साठी पाच किलोमीटर अंतर राहणार आहे. याशिवाय मुलांसाठी सोळाशे मीटर व मुलींसाठी सोळाशे मीटर धावणे अशा स्वतंत्र गटातही स्पर्धा होईल. पुरुषांसाठी दोनशे रुपये तर महिलांसाठी शंभर रुपये प्रवेश फी राहणार आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी 9860834243 , 9763997897, 8421330212 या नंबरवर संपर्क साधावा. तसेच इच्छुक स्पर्धकांनी दोन जून पर्यंत आपली नाव नोंदणी श्री छ शाहू सह.साखर कारखाना, राजे विक्रमसिंह घाटगे फौंउडेशन कागल व राजमाता जिजाऊ महिला समिती कागल यांचेकडे करावीत असे आवाहनही केले आहे.

रन फॉर लिगसी
छ.शाहू महाराज यांचा वारसा जपण्यासाठी पळा ( रन फॉर लिगसी) या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले असून मी त्यांच्या जनक घराण्याचा वंशज म्हणून स्वतः या स्पर्धेमध्ये धावणार आहे, असेही घाटगे म्हणाले.

Advertisements

Related Stories

महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात 729 नवे रुग्ण

Rohan_P

“राहुल गांधींना लोकसभेतून वर्षभरासाठी निलंबित करा”

Abhijeet Shinde

मासिक पासधारक करणार विशेष रेल्वेने प्रवास

Abhijeet Shinde

साखरपुड्यासाठी निघालेली बस 50 प्रवाशांसह 100 फूट दरीत कोसळली

datta jadhav

खानापूर नगरपंचायत नगराध्यक्षपदी डॉ.उदयसिंह हजारे : उपनगराध्यक्षपदी सुवर्णा कांबळे

Sumit Tambekar

भाजपने मला टार्गेट करायचं ठरवलयं : मंत्री मुश्रीफ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!