Tarun Bharat

मंत्रिमंडळात तूर्त बदल नाहीच

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे संकेत

प्रतिनिधी /पणजी

मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांचे असून तेच त्यासंदर्भात निर्णय घेतील, असे गोवा प्रभारी सी टी रवी यांनी सांगितले असले तरी स्वतः मुख्यमंत्र्यांनी मात्र त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.

भाजप कोअर कमिटीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष अधिक मजबूत करणे तसेच अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून विविध संघटनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने वेगवेगळ्या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

समाजाच्या अखेरच्या घटकापर्यंत पोहोचण्याच्या हेतूने पक्षाचे मंत्री, आमदार, अन्य नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते असे सर्वचजण अंत्योदय तत्वावर काम करत आहोत. त्यातून लोकसंपर्क वाढविण्यावर भर दिला असून हे कार्य अखंड चालूच राहणार असल्याचे ते म्हणाले. लवकरच पक्षाचे महामंत्रीही गोवा भेटीवर येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Related Stories

खांडोळा कॉलेज रस्त्यावर झाडांमुळे वाहतुकीस अडथळा

Amit Kulkarni

शिरोडय़ातील नक्षत्र स्पर्धेत कपिल बोरकर प्रथम

Amit Kulkarni

नवे शैक्षणिक धोरण पुढील वर्षापासून

Patil_p

अपहरणप्रकरणी आरोपी जेरबंद

Amit Kulkarni

गोव्यात हिरव्या चाऱयाची कमतरतेचा दूध उत्पादनाला फटका

Patil_p

केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घ्यावी

Patil_p
error: Content is protected !!